Weather Update : राज्यात पाऊस उघडीप देणार !

राज्यात गुरुवारी बहुतांश भागांत पावसाची अघडीप कायम होती. पालघर जिल्ह्यात डहाणू, जव्हार, मोखेडा, वाडा या मंडळांमध्ये हलक्या पावसानं हजेरी लावली.
Rain Update
Rain UpdateAgrowon

पुणेः राज्यात पावसाची उघडीप (Rainfall) कायम आहे. गुरुवारी राज्यात बहुतांश भागांत पाऊस (Rain Update) नव्हता. तर काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या. उद्या सकाळपर्यंत राज्यात पावसाची उघडीप कायम राहील, असा अंदाज हवामान विभागानं (Weather Update) जाहीर केलाय.

Rain Update
Soybean : एकूण पेरणीच्या निम्मे क्षेत्र सोयाबीन

राज्यात गुरुवारी बहुतांश भागांत पावसाची अघडीप कायम होती. पालघर जिल्ह्यात डहाणू, जव्हार, मोखेडा, वाडा या मंडळांमध्ये हलक्या पावसानं हजेरी लावली. तर इतर भागांत पावसानं विश्रांती घेतली. रायगड जिल्ह्यातही हलक्या सरी पडल्या. माथेरान येथे मध्यम सरी पडल्या. तर कर्जत, महाड, म्हसला, पोलादपूर, ताळा येथे हलका पाऊस झाला. रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाचा जोर कमी होता. दापोली, गुहागर, खेड, मंडणगड या मंडळांमध्ये पाऊस झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाचं प्रमाण कमी झालं.

Rain Update
Heavy Rain : नाशिक जिल्ह्याच्या पश्‍चिम पट्ट्यात पुन्हा अतिवृष्टी

मध्य महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर, धुळे, जळगाव, नंदूरबार आणि नगर जिल्ह्यांत पावसाची उघडीप होती. कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे ६९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर पेठ, गुरगणा या मंडळांमध्ये हलक्या सरी पडल्या. पुणे जिल्ह्यातही काही ठिकाणी पाऊस झाला. मात्र पावसाचं प्रमाण कमी होतं. सातारा जिल्ह्यातही काही मंडळात हलक्या सरी पडल्या. मात्र जिल्ह्यातील इतर भागांत पावसाची उघडीप होती.

मराठवाड्यातील सर्वंच जिल्ह्यांमध्ये पावसाची उघडीप कायम होती. औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी आणि बीड जिल्ह्यात पाऊस नव्हता. काही ठिकाणी पावसाची भूरभूर होती. मात्र नोंद घ्यावी असा पाऊस गुरुवारी झाला नाही. तर विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा या जिल्ह्यांत पावसाची उघडीप कायम आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यात काही मंडळांत हलक्या सरी पडल्या. तसचं गडचिरोली, गोंदीया, भंडारा, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातही पावसाची उघडीप होती.

हवामान विभागानं उद्या सकाळपर्यंत राज्यात पावसाची उघडीप कायम राहील, असा अंदाज व्यक्त केलाय. तर काही ठिकाणी विजांसह हलक्या सरी पडतील असा इशारा दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com