Weather Update : पावसाची उघडीप कायम

राज्यात आज पावसाची उघडीप कायम होती. राज्यातील काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या. मात्र पावसाचा जोर कमी होता.
Rain Update
Rain UpdateAgrowon

पुणेः राज्यात आज पावसाची (Rain Update) उघडीप कायम होती. राज्यातील काही ठिकाणी हलक्या सरी (Light Rainfall) पडल्या. मात्र पावसाचा जोर (Rain Intensity) कमी होता. उद्या सकाळपर्यंत राज्यात पावसाची उघडीप कायम राहील, असा अंदाज हवामान विभागानं (Weather Department) वर्तविला.

Rain Update
Monsoon Rain : माॅन्सूनचा परतीचा प्रवास आज रेंगाळला

कोकणात आजही पावसाचा जोर कमी होता. रायगड जिल्ह्यातील माथेरान, तळा, श्रीवर्धन, मानगाव या मंडळांमध्ये पावसानं हजेरी लावली. तर पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी मंडळांमध्ये हलका पाऊस झाला. तर इतर जिल्ह्यांमध्ये पावसाची उघडीप होती.

Rain Update
Monsoon Rain: राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज

मध्य महाराष्ट्रातही आज पावसानं विश्रांती दिली. जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. मात्र इतर जिल्ह्यांमध्ये उन्हाचा चटका जाणवला.

मराठवड्यातही बहुतांशी भागांमध्ये पावसाची उघडीप होती. लातूर, नांदेड आणि औरंगाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. तर बीड जिल्ह्यातील काही मंडळांमध्ये पावसाची भूरभूर सुरु होती. मात्र मराठवाड्यात जोरदार पाऊस झाला नाही. विदर्भातही आज पावसानं उघडीप दिली होती.

गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या. विदर्भात इतर ठिकाणी पावसानं पूर्णपणे उघडीप दिली होती. हवामान विभागानं उद्या सकाळपर्यंत राज्यात पावसाची उघडीप राहील. मात्र काही ठिकाणी पावसाचा शिडकावा होऊ शकतो, असा अंदाज जाहीर केलाय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com