Weather Update : कोकणासह पूर्व विदर्भात जोर कायम राहणार

मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा आणखी दक्षिणेकडे सरकला आहे. गुजरातच्या नालियापासून तीव्र कमी दाब क्षेत्राचे केंद्र ते पूर्व-मध्य बंगाल उपसागर ते उत्तर अंदमान समुद्रापर्यंत विस्तारला आहे.
Weather Update
Weather Update Agrowon

पुणे : मॉन्सून (Monsson) सक्रिय असल्याने राज्यात दमदार पाऊस कोसळत आहे. आज (ता. १०) कोकण व मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा, पूर्व विदर्भात पावसाचा जोर (Rain Intensity) कायम राहणार आहे. विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाचा (Heavy Rain) ‘रेड अलर्ट’ (Rain Red Alert)देण्यात आला आहे. उर्वरित राज्यातही मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा आणखी दक्षिणेकडे सरकला आहे. गुजरातच्या नालियापासून तीव्र कमी दाब क्षेत्राचे केंद्र ते पूर्व-मध्य बंगाल उपसागर ते उत्तर अंदमान समुद्रापर्यंत विस्तारला आहे. गुजरात ते केरळ किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा आहे. महाराष्ट्राच्या मध्य भागात पूर्व-पश्‍चिम वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोड क्षेत्र कायम आहे.

Weather Update
Fertilizer Import : खत आयातीवरील अवलंबित्व कायम

कमी दाबाचे क्षेत्र, दक्षिणेकडे असलेला मॉन्सूनचा आस, किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा यासह पूरक प्रणालीमुळे आज (ता. १०) विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्याचा घाटमाथा आणि विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ आहे. तर उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्र आणि तुरळक ठिकाणी विदर्भात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तविला आहे.

Weather Update
Kharif Sowing: सरासरी पाऊस खरिपासाठी लाभदायक

कमी दाब क्षेत्र तीव्र

बंगालच्या उपसागरात ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र (डिप्रेशन) सक्रिय आहे. मंगळवारी (ता. ९) हे केंद्र ओडिशाच्या भुवनेश्‍वरपासून ७० किलोमीटर वायव्येकडे होते. वायव्य दिशेकडे सरकत असलेल्या या प्रणालीची तीव्रता ओसरणार आहे.

मुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट)

गडचिरोली.

.......

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर

...........

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदूरबार, कोल्हापूर, अकोला, अमरावती, गोंदिया

.......

विजांसह पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :

बुलडाणा, वाशीम, यवतमाळ.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com