Weather Update : कोकण, घाटमाथा आणि विदर्भात पावसाचा जोर वाढणार

आज (ता. १२) कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार असून, पूर्व विदर्भात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर राज्यातही अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
Weather Update
Weather Update Agrowon

पुणे : मॉन्सून चांगलाच सक्रिय (Monsoon Activate In Maharashtra) झाल्याने राज्यात दमदार पाऊस (Heavy Rainfall) सुरू आहे. घाटमाथ्यावरील जोरदार पावसाने (Heavy Rain In Ghatmatha) नद्या नाले ओसंडून वाहू लागले आहेत. आज (ता. १२) कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार असून, पूर्व विदर्भात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर राज्यातही अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने (Weather Department) वर्तविला आहे.

पूर्व किनाऱ्यावरील कमी दाबाची वाढणारी तीव्रता, दक्षिणेकडे कायम असलेला मॉन्सूनचा आस, गुजरात पासून ते उत्तर कर्नाटक पर्यंत पश्चिम किनाऱ्याला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा, महाराष्ट्राच्या मध्य भागातून ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर पूर्व-पश्चिम दिशेने वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोड क्षेत्र कायम आहे. या हवामान प्रणाली पूरक असल्याने मॉन्सूनचा पाऊस सक्रिय झाला आहे.

Weather Update
Weather Updates: घाटमाथ्यावर दमदार पाऊस,धरणसाठ्यात होणार वाढ

आज (ता. १२) कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील नाशिक पुणे, कोल्हापूर जिल्ह्यांचा घाटमाथा, पूर्व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात अतिजोरदार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) आहे. मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, सातारा, औरंगाबाद, जालना, चंद्रपूर या जिल्ह्यांतही दमदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. विदर्भासह राज्याच्या बहुतांश भागात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढणार

दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशमधील कमी दाब क्षेत्र सोमवारी (ता. ११) ओडिशाच्या किनाऱ्यालगत बंगालच्या उपसागरावर सक्रिय होते. त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत असून, उद्यापर्यंत या कमी दाब क्षेत्राची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या जैसलमेर पासून कमी दाब क्षेत्राचे केंद्र ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीपर्यंत कायम आहे.

अतिजोरदार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) :

पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, कोल्हापूर, गडचिरोली.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, सातारा, औरंगाबाद, जालना, चंद्रपूर.

जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) :

नंदूरबार, धुळे, जळगाव, नगर, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com