Water Conservation : जिरायती कानडगाव पाचदशकांनी जलसमृद्धीकडे

पाच दशकांपासून जलदुर्भिक्षाला सामोरे जात असलेल्या कानडगावची (ता. राहुरी) आता जलसमृद्धीकडे वाटचाल सुरू झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात पन्नास वर्षानंतर प्रथमच गावातील सातही बंधारे, सर्व विहिरी व विंधन विहिरी तुडुंब भरल्या आहेत.
Water
Water Agrowon

कोल्हार, जि. नगर : पाच दशकांपासून जलदुर्भिक्षाला सामोरे जात असलेल्या कानडगावची (ता. राहुरी) आता जलसमृद्धीकडे (Water Prosperity) वाटचाल सुरू झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात पन्नास वर्षानंतर प्रथमच गावातील सातही बंधारे (Water Bunds) , सर्व विहिरी व विंधन विहिरी तुडुंब भरल्या आहेत. शेतशिवारे फुलविणाऱ्या जलस्रोतामुळे (Water Source) जिरायती टापूतील या गावात शाश्वत विकासाचे आशादायी चित्र निर्माण झाले आहे.

Water
Water Conservation : राजापुरात लोकसहभागातून उभारले वनराई बंधारे

सामाजिक संस्थांचा पुढाकार, लोकसहभाग, उद्योग समूहाचे सामाजिक दायित्व व राज्य शासनाच्या सहकार्याने हे गाव पाणीदार झाले आहे. देवळाली प्रवरा येथील अण्णासाहेब कदम पाटील शेती व ग्रामविकास प्रतिष्ठान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न जनकल्याण समिती व सेवावर्धिनी, ॲटलास कॅप्को कंपनी या स्वयंसेवी सामाजिक संस्थांसह गावाच्या लोकसहभागातून संपूर्ण जलसमृद्धीचा हा पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाला आहे.

Water
Water Conservation Scheme : पाझर तलावांच्या दुरुस्तीसाठी अडीच कोटी

प्रतिष्ठानचे अध्यक्ष भवानराव थोरात म्हणाले,‘‘पाण्याअभावी गावाचा विकास स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षापर्यंत होऊ शकला नाही. कानडगावची ही शोकांतिका आहे. गावाचा शाश्वत विकास हा केवळ पाण्याच्या शाश्वत उपलब्धतेवरच अवलंबून असल्याचे लक्षात घेऊन अण्णासाहेब कदम पाटील प्रतिष्ठानने सर्वप्रथम या गावात पाणलोटक्षेत्र विकासाचे दीर्घकालीन काम हाती घेतले. प्रथम वरच्या तलावातील दहा हजार घनमीटर गाळ काढून शिवारातील खडकाळ शेतांमध्ये पसरवून जमीन लागवडी योग्य केली.’’

थोरात म्हणाले, ‘‘पाणलोट क्षेत्र विकासाच्या प्रस्तावित दुसऱ्या टप्प्यातील परावर्तित जलवाहिनी प्रकल्प अतिशय महत्वाकांक्षी होता. परंतु कोरोनाच्या संकटामुळे प्रकल्प दोन वर्षे उशिरा कार्यान्वित झाला. पुण्याच्या सेवावर्धिनीच्या जलदूत दोन प्रकल्पांतर्गत या तलावातील अतिरिक्त वाहून जाणारे पाणी पश्चिमेकडील मृत ओढ्यात वळविण्याचा हा प्रकल्प अत्यंत कठीण तांत्रिक व आर्थिकदृष्ट्या खर्चिक असला तरी प्रयत्नांची पराकाष्ठा करून तो पूर्ण झाला आहे.

वरच्या तलावाला संलग्न असलेल्या खालच्या तलावातील अतिरिक्त वाहून जाणारे पाणी तीन फूट व्यासाच्या सिमेंटच्या २३८ मीटर लांबीच्या भूमिगत जलवाहिनीद्वारे प्रवाहित करण्यात आले. त्यामुळे या ओढ्याच्या सुमारे तीन किलोमीटरच्या प्रवाह मार्गावरील सातही बंधारे प्रथमच पूर्ण क्षमतेने भरून गाव जलसमृध्द झाले आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे गावकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. एकबार पीक पद्धतीकडून आता दुबार पीक पद्धतीकडे वळण्याचा मार्ग सुकर झाला असून उन्हाळी पिके घेण्याची शास्वती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.

जलसंवर्धन प्रकल्पाचे लवकरच लोकार्पण

सुमारे १८ लाख रुपये प्रस्तावित खर्चाचा हा जलसंवर्धन प्रकल्प १६ लाखांत व नियोजित वेळेत पूर्ण झाला आहे. सेवावर्धिनीच्या माध्यमातून पुण्याच्या ॲटलास कॅप्को कंपनीने आपल्या सीएसआर फंडातून भरीव अर्थसाहाय्य केले आहे. प्रकल्पाचा लोकार्पण समारंभ लवकरच होणार असल्याची माहिती भवानराव थोरात यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com