पावसाचा जोर वाढला

जेजुरीत सर्वाधिक ५४ मिलिमीटरची नोंद; पुणे जिल्ह्यात १५ मिलिमीटर पाऊस
पावसाचा जोर वाढला
Heavy RainAgrowon

पुणे : गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाचा जोर (Rainfall) वाढत आहे. पुणे जिल्ह्यात जेजुरी येथे सर्वाधिक ५४.५ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद कृषी विभागाकडे (Department Of Agriculture) झाली आहे. तर जिल्ह्यात गेल्या २३ दिवसांतील सर्वाधिक १५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात जवळपास हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. (Rain Update)

एक जूनपासून पावसास सुरुवात झाली होती. त्यानंतर काहीसा खंड पडल्याने पुरेसा पाऊस झालेला नव्हता. मात्र मागील काही दिवसांपासून पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे सकाळपासूनच ढगाळ वातावरण तयार होत आहे. दुपारनंतर काही प्रमाणात हलक्या सरी बरसत आहे. परंतु बुधवारी (ता. २२) सायंकाळी वातावरणात चांगलाच बदल झाल्याने अचानक ढग भरून आले होते. त्यानंतर पावसास सुरुवात झाली. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला असल तरी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी बरसल्या.

पावसामुळे शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी सुरू केली आहे. काही ठिकाणी जोरदार पावसामुळे पुरेशा प्रमाणात ओल तयार झाल्याने पेरणीस सुरुवातही केली असल्याची स्थिती आहे. जेजुरी पाठोपाठ चिंचवडमध्ये ५३.३ मिलिमीटर पाऊस पडला. हवेलीतील पुणे शहर, केशवनगर, खडकवासला, थेऊर, उरूळी कांचन, वाघोली, मुळशीतील पौड, घोटावडे, थेरगाव, माले, मुठे, पिरंगुट, भोरमधील भोलावडे, आंबवडे, संगमनेर, निगुडघर, मावळमधील तळेगाव, मावळ, कार्ला, खडकाळा, लोणावळा, शिवणे, खेडमधील वाडा, बारामतीतील माळेगाव, माळेगाव, वडगाव, लोणी, इंदापुरातील भिगवण, निमगाव, अंथुर्णी, सणसर, दौंडमधील पाटस, यवत, कडेगाव, राहू, वरवंड, दौंड, पुरंदरमधील भिवंडी, कुंभारवळण, राजेवाडी, वाल्हा येथे हलका पाऊस पडला.

जिल्ह्यात तारीखनिहाय झालेला एकूण पाऊस, मिलिमीटरमध्ये :

१ जून - ४.४ मिलिमीटर, २ जून १.२, ६ जून ३.४, ९ जून ९.६, १० जून ३.५, ११ जून ४.५, १२ जून २.८, १३ जून २.२, १४ जून १.३, १५ जून ०.१, १६ जून ०.१, १७ जून ०.४, १८ जून ०.१, १९ जून ०.३, २० जून ०.७, २१ जून २.९, २२ जून १.३, २३ जून १५.२

गुरुवारी (ता. २३) सकाळी आठ वाजेपर्यंत १० मिलिमीटरपेक्षा अधिक झालेला मंडळनिहाय पाऊस, मिलिमीटरमध्ये : हवेली - कोथरूड ३०.५, खेड १३.३, भोसरी २१.०, कळस १९.८, हडपसर १०.८. भोर - नसरापूर १६.०, किकवी १०.३, वेळू १४.०. मावळ - काले १४.०. वेल्हा - वेल्हा २७.८, पानशेत १४.५, विंझर २५.३, अंभवणे १८.८. जुन्नर - जुन्नर ११.५, नारायणगाव २२.०, वडगाव आनंद १२.८, निमगाव सावा ४१.८, बेल्हा ४३.०, राजूर १४.०, डिंगोरे १४.०, आपटाळे १७.८, ओतूर १३.०. खेड - राजगुरुनगर २३.८, कुडे ११.५, पाईट ११.५, चाकण २५.८, आळंदी २३.८, पिंपळगाव २३.८, कन्हेरसर २३.८, कडूस २३.८. आंबेगाव - घोडेगाव १४.३, आंबेगाव २३.३, कळंब ३०.५, पारगाव ४३.०, मंचर २९.८. शिरूर - टाकळी ४०.५, वडगाव १४.३, न्हावरा १४.३, मलठण ४०.५, तळेगाव २१.८, रांजणगाव २१.८, कोरेगाव २१.८, पाबळ २९.५, शिरूर ११.८. बारामती - पणदरे १३.३, सुपा २२.०, मोरगाव २४.३, उंडवडी ३०.८. इंदापूर - इंदापूर १६.५, लोणी १०.८, बावडा १४.०, काटी १५.३. दौंड - देऊळगाव २४.३, रावणगाव २१.५. पुरंदर - सासवड १५.५, परिंचे ३१.८.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com