
Raj Thackeray Latest News : गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्हा बँकेने थकबाकीदार शेतकऱ्यांविरोधात धडक मोहिम सुरू केली आहे. यामध्ये वर्षानुवर्षे थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांवर बँकेने जप्तीची कारवाई केली आहे.
याच पार्श्वभूमीवर नाशिक दौऱ्यावर आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. यावेळी राज ठाकरे शेतकऱ्यांवर संतापल्याचे पाहायला मिळाले.
अडचणीत असलेल्या नाशिक जिल्हा बँकेने सध्या थकबाकीदारांविरोधात कर्जवसुलीचा तगादा लावला आहे. आधी अतिवृष्टी आणि नंतर झालेला अवकाळी पाऊस यामुळे शेकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे कर्जाची परतफेड करण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. अशी परिस्थितीत बँकेने शेतकऱ्यांविरोधात कर्ज वसूलची धडक मोहिम सुरू केली आहे.
राज ठाकरे यांच्याकडे आपली कैफियत घेवून गेलेले शेतकरी राज यांनी केलेल्या प्रश्नामुळे गोंधळून गेले. राज म्हणाले की, अडचणीच्या काळात तुम्ही माझ्याकडे येता, जे लोक तुमची पिळवणूक करतात, त्यांना तुम्ही मतदान करता.
याचे भान तुम्ही ठेवायला पाहिजे, अशा कडक शब्दात राज यांनी शेतकऱ्यांना सुनावले. त्यामुळे तेथे उपस्थित असलेले शेतकरी काही क्षणासाठी गोंधळून गेल्याचे पाहायला मिळाले. परंतु, आम्ही तुमच्यासोबत राहू, असा दिलासाही राज यांनी शेतकऱ्यांना दिला.
दरम्यान, शेतकऱ्यांनी आम्ही कर्जाची थकबाकी भरण्यास तयार आहोत. मात्र, त्यासाठी आम्हाला थोडा वेळ मिळायला हवा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी राज ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली. परंतु, तुम्ही आम्हाला मतदान करत नसल्याची नाराजी राज यांनी स्पष्टपणे शेतकऱ्यांकडे बोलून दाखवली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.