Raj Thakray : राज ठाकरे यांचे ‘मिशन विदर्भ’ सुरू

विदर्भातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत घेणार बैठका. कार्यकर्त्यांनी बाईक रॅलीने त्यांना हॉटेलपर्यंत नेले. तेथे पोहोचताच हजारो कार्यकर्त्यांनी तेथे गर्दी केली. येथून ठाकरे यांचा विदर्भ दौरा सुरू झाला आहे.
Raj Thakrey
Raj ThakreyAgrowon

नागपूर ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thakrey) यांचे रविवारी (ता. १८) सकाळी नागपूर रेल्वे स्थानकावर (Nagpur Railway Station) आगमन झाले. हजारो कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. कार्यकर्त्यांनी बाईक रॅलीने त्यांना हॉटेलपर्यंत नेले. तेथे पोहोचताच हजारो कार्यकर्त्यांनी तेथे गर्दी केली. येथून ठाकरे यांचा विदर्भ दौरा ( Vidarbha Tour) सुरू झाला आहे.

Raj Thakrey
Sharad Pawar : ‘रयत’च्या पाठीशी नगरकरांचा मजबूत पाठिंबा : शरद पवार

ठाकरे रवी भवन येथे पाच जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील. या बैठकीत आगामी निवडणुकींच्या अनुषंगाने आढावा घेऊन पदाधिकाऱ्यांना ते मार्गदर्शन करतील. ठाकरे हे तब्बल ८ वर्षांनंतर नागपुरात आले आहेत. यापूर्वी २०१४ साली ते आले होते. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीच्या वेळी आले होते. पण नागपूर शहरात ते आलेच नाही, तर विमानतळावरून थेट यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे गेले.

Raj Thakrey
Heavy Rainfall : मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान

तेथे मनसेचे उमेदवार राजू उंबरकर यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. त्यानंतर प्रथमतः विदर्भात ते आले आहेत. ठाकरे हे पूर्व विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा तर पश्चिम विदर्भातील अमरावती येथे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेतील. दरम्यान अमरावती येथे पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती आहे. नागपूर येथे हॉटेलवर मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर, अविनाश जाधव, प्रवक्ते संदीप देशपांडे आदी पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

दरम्यान, ‘‘आमची कुणासोबतही युती नाही आणि आम्ही आगामी निवडणुका स्वबळावर लढणार आहोत,’’ असे उंबरकर यांनी या वेळी सांगितले. उंबरकर म्हणाले, ‘‘राज ठाकरे यांचे मित्र प्रत्येक राजकीय पक्षात आहेत. याचा अर्थ त्यांच्यासोबत आमची युती आहे, असा होत नाही. सध्यातरी स्वबळावर निवडणुका लढण्याची तयारी आम्ही करत आहोत.’’

‘‘आता आम्ही ग्रामपंचायतीमध्ये प्रवेश केला आहे. यापुढे नगर पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आम्ही लढणार आहोत. त्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत,’’ असे आदित्य दुरुगकर यांनी सांगितले.

मनसे स्वबळावर निवडणुका लढणार आहे. आम्हाला कुणासोबतही युती करण्याची गरज नाही.

- अविनाश जाधव, नेते, मनसे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com