Barsu Refinery Project : बारसूचा मुद्दा पेटणारं ; राजू शेट्टींना रत्नागिरी जिल्ह्यात जाण्यास बंदी

कोकणात होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. राजापूर तालुक्यातील बारसू आणि इतर गावांतील ग्रामस्थ रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन करत आहेत.
Raju Shetti
Raju ShettiAgrowon

Barsu Refinery Protest : कोकणात होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. राजापूर तालुक्यातील बारसू आणि इतर गावांतील ग्रामस्थ रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन (Refinery Project) करत आहेत. दरम्यान, प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आल्याची घटना घडली होती.

या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोणतीही तारीख न सांगता बारसूला जाण्याच इशारा दिला होता. मात्र, त्यापूर्वीच शेट्टी यांनी आजपासून रत्नागिरी जिल्ह्यात येण्यासाठी जिल्हाबंदी करण्यात आली आहे. परंतु आपण बारसूला जाणारच, अशी प्रतिक्रिया शेट्टी यांनी दिली आहे.

Raju Shetti
Barsu Refinery : मुख्यमंत्र्यांनी आगीशी खेळू नये; राजू शेट्टींचा इशारा

रत्नागिरी पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा शेट्टी यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन जिल्हाबंदीबाबतची नोटीस बजावली आहे. ३१ मेअखेर शेट्टी यांना रत्नागिरी जिल्हाबंदी करण्यात आल्याचे नोटीशीत म्हटले आहे.

तसेच बारसू प्रकल्पाबाबत कोणतेही वक्तव्य अथवा सोशल मीडियामध्ये पोस्ट, चित्र किंवा व्हिडीओ प्रदर्शित करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. मात्र, आपण बारसूला जाणारच असल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे.

Raju Shetti
Barsu Oil Refinery Project : शेतकऱ्यांना विश्‍वासात घेऊनच बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्प होणार

बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिकांना पाठिंबा देण्यासाठी आपण रत्नागिरीला जाणार असल्याची घोषणा शेट्टा यांनी केली होती. दोन दिवसांपूर्वीच शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांनी आगीशी खेळू नये, असा इशारा दिला होता. आंदोलक शेतकरी आणि स्थानिकांवर केलेल्या लाठीचार्जप्रकरणी गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण देण्याची मागणीही शेट्टींनी यावेळी केली होती.

Raju Shetti
Barsu Refinery Protest : स्थानिकांचा बारसू रिफायनरीला विरोध असेल तर चर्चेतून मार्ग काढा - शरद पवार

तसेच प्रकल्पासाठी पोलिसांची दंडेलशाही कशासाठी, असा सवालही शेट्टी यांनी उपस्थित केला होता. बारसू रिफायनरीविरोधात स्थानिकांना पाठिंबा देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहण्यासाठी आपण कोणतीही तारीख न देता थेट बारसूमध्ये जाण्याचा इशारा शेट्टी यांनी दिला होता. मात्र, त्याआधीच प्रशासनाने शेट्टी यांना रत्नागिरी जिल्ह्यात येण्यासाठी जिल्हाबंदी केली आहे.

दरम्यान, स्थानिकांचा विरोध झुगारून सरकारने प्रस्तावित ठिकाणी माती परिक्षणाचे काम सुरू केले आहे. माती परिक्षणाविरोधात दोन दिवसांपूर्वी स्थानिकांनी आंदोलन केले.

यावेळी आंदोलकांना रोखण्यासाठी मोठा पोलीसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. यावेळी आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज कण्यात आला होता. तसेच त्यांच्यावर अश्रूधराच्या नळकांड्याही फोडल्या.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com