Raju Shetty : बिऱ्हाड आंदोलनात राजू शेट्टी सहभागी होणार

शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन
Raju Shetti
Raju ShettiAgrowon

नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शेतकऱ्यांकडून थकबाकी वसुली व शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर शेतकऱ्यांची नावे कमी करून लिलाव करण्याचे कारवाई विरोधात सर्व शेतकरी संघटना, राजकीय पक्ष एकवटले असून, पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या घरासमोर १६ जानेवारी रोजी शेतकरी संघटना (Farmer Union) व थकबाकीदार शेतकरी व त्यांचे कुटुंब बिऱ्हाड आंदोलन (Bihrad Movement) करणार आहे.

Raju Shetti
Raju Shetty : एकरकमी ‘एफआरपी’साठी प्रसंगी रक्त सांडू : राजू शेट्टी

यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पाठिंबा दर्शवीत स्वत: या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगितले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांसह जिल्ह्यातील शिष्टमंडळाने स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची शुक्रवारी (ता. ३०) शिरोळ (ता. कोल्हापूर) येथे निवासस्थानी भेट घेतली.

या वेळी बँक करीत असलेल्या कारवाईची सविस्तर माहिती संदीप जगताप, गंगाधर निखाडे, प्रशांत कड, राजेंद्र महाले, संतोष रेहरे आदींनी यांनी शेट्टी यांना दिल्यानंतर त्यांनीही या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे हे आंदोलन ऐतिहासिक ठरणार आहे. शेट्टी म्हणाले, की थकबाकीदार ६२ हजार शेतकऱ्यांना माझी विनंती आहे, की आता जप्ती येणार आहे.

Raju Shetti
Raju Shetty : राजू शेट्टींचा शेतकऱ्यांनी केला सत्कार

वसुलीचा वरवंटा फिरणार आहे. हे जर थांबवायच असेल, तर पुढे यावे लागेल. आम्ही काय बुडवे नाहीत, आमचं कर्ज माफ करा असे कधी म्हटले नाही. पण एकवेळ समझोता योजना अंतर्गत सन्मानाने यातून काहीतरी मार्ग काढावा, अशी आमची भूमिका आहे, असे शेट्टी यांनी सांगितले.
निकाल लागत नाही तोपर्यंत निर्धाराने सहभागी होण्यासाठी येथे यावे. कर्जाचा काहीतरी निर्णय तोडगा काढायचा असेल. तर प्रत्येक थकबाकीदार शेतकऱ्यांना या मोर्चात 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com