Sugarcane FRP : ...अन्यथा २५ नोव्हेंबरला चक्का जाम करू; राजू शेट्टी यांचा इशारा

विविध पातळीवरची आंदोलने करूनही सरकारला जाग येत नसल्याने येत्या 25 तारखेला राज्यभर चक्का जाम आंदोलन करून शेतकऱ्यांची ताकद दाखवणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी(ता.18) येथे पत्रकार परिषदेत दिला.
Raju Shetti
Raju ShettiAgrowon

कोल्हापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाकडे (Swabhimani Agitation) सरकार दुर्लक्ष करत आहे. विविध पातळीवरची आंदोलने करूनही सरकारला जाग येत नसल्याने येत्या 25 तारखेला राज्यभर चक्का जाम आंदोलन (Chakka Jam Agitation) करून शेतकऱ्यांची ताकद दाखवणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी शुक्रवारी(ता.18) येथे पत्रकार परिषदेत दिला.

Raju Shetti
Sugarcane FRP : ऊसदर प्रश्नी सिंगणापूर फाटा येथे ‘स्वाभिमानी’चा रास्तारोको

दरम्यान आज(ता.19) पासून राज्यात जिथे म्हणून मंत्री कार्यक्रमाला जातील त्या ठिकाणी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्याकडून या मंत्र्यांना जाब विचारला जाणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

Raju Shetti
Sugarcane FRP : ‘ऊसतोड बंद’मध्ये सहभागासाठी ‘स्वाभिमानी’ची हाक

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मागील हंगामात तुटलेल्या ऊसाला एफ आर पी व्यतिरिक्त 200 रुपये द्यावेत आणि यंदाच्या उसाला एक रकमी एफआरपी मिळावी यासह अन्य मागण्यासाठी दोन दिवस लाक्षणिक ऊसतोड बंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर श्री शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत पुढील दिशा स्पष्ट केली.

श्री शेट्टी म्हणाले, मी आजवर पाहिलेल्या सरकार पैकी सर्वात असवेदनशील सरकार सध्याचे आहे. आमच्या आंदोलनाकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे अशी आमची भावना आहे. अनेक कारखान्यांनी रिकवरी कमी दाखवून शेतकऱ्यांना फसवण्याचे उद्योग सुरू केले आहेत. वाहतुकीचा खर्च भरमसाठ दाखवून शेतकऱ्यांना लुटण्याचे काम सुरू आहे.

काटा मारी करून शेतकऱ्यावर कोट्यावधी रुपयांचा दरोडा टाकण्याचे काम राजरोसपणे सुरू आहे. यावर नियंत्रण आणण्याचे काम सरकारचे आहे. सरकारला कोणत्याही जादा भुर्दंड पडेल अशा मागण्या करत नाही आहोत. व्यवस्था सुधारण्यासाठी नियम करण्याबाबत सरकारला विनंती करत आहोत.

सरकार आमचे ऐकूनच घ्यायला तयार नाही. त्यामुळे आमचा नाइलाज आहे. आता ताकद दाखवण्याची वेळ आली असून याचा फटका राज्यकर्त्यांनाही बसणार आहे. या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आम्ही आता राज्यव्यापी रस्ता रोको करून सरकारचे लक्ष वेधणार आहोत. पुढच्या आंदोलनाची घोषणा ही त्याच वेळी करण्यात येईल. असे श्री शेट्टी यांनी यावेळी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com