Ramdas Athwale : बाळासाहेबांनी यावे अन् पक्षाचे अध्यक्ष व्हावे, मी मंत्री होईन!

१९५७ मध्ये महापरिनिर्वाणानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली होती. तमिळनाडूचे एससी फेडरेशनचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष होते. पण वर्षभराने पक्षात फूट पडली.
Ramdas Athawale
Ramdas AthawaleAgrowon

नागपूर ः १९५७ मध्ये महापरिनिर्वाणानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची (Republican Party Of India) स्थापना करण्यात आली होती. तमिळनाडूचे एससी फेडरेशनचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष होते. पण वर्षभराने पक्षात फूट पडली. तेव्हापासून गटबाजीचे ग्रहण पक्षाला लागले, ते आजही सुरूच आहे. पण आता बाळासाहेब आंबेडकर (Balasaheb Ambedkar), प्रा. जोगेंद्र कवाडे (Jogendra Kawade) आणि सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे रिपाइंचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) म्हणाले.

Ramdas Athawale
Cotton Rate : कापूस आवक का घटली?

धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्यासाठी बुधवारी (ता. ५) नागपुरात आले असता पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, की ज्या ज्या वेळी आम्ही एकत्र आलो, त्या त्या वेळी रिपाइंचा फायदाच झाला आहे. एक वेळ तर आमचे ९ खासदार निवडून आले होते. आता जर आम्ही सर्व एकत्र आलो तर आपल्या जनतेचा फायदाच होणार आहे. त्यामुळे सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन आठवलेंनी केले. वाटलंच तर बाळासाहेब आंबेडकरांनी आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व्हावे आणि मी मंत्री होईन, असेही आठवले म्हणाले.

Ramdas Athawale
Soybean Rate : अमेरिकेतील सोयाबीन दर टिकणार का?

हत्ती हे चिन्ह बसपाकडे असले तरी मुळात ते रिपाइंचे चिन्ह आहे. बसपच्या काशिराम यांना ते चिन्ह मिळाले. त्यावर आमचा अधिकार आहे. आम्ही ते मिळवण्याचा प्रयत्न केला. पण मिळाले नाही. उगवता सूर्य होता पण तोही आता मावळला. पुन्हा गटबाजी सुरू झाली. ऐक्याला सकारात्मक माझी भूमिका आहे. गटबाजी नेस्तनाबूत केली पाहिजे. रिपाइं एकत्रितपणे जर आला तर या राज्यात मोठी ताकद उभी राहू शकते.

बाळासाहेब आंबेडकर, राजेंद्र गवई, प्रा. जोगेंद्र कवाडे या सर्वांना माझे आवाहन आहे, की कुठंतरी आपण सर्वांनी एकत्र येण्याचा विचार केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. ऐक्याला माझ्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे. दलित पॅंथर म्हणजे दलितांच्या संरक्षणाचे कवच होते. तरुणांना जागरूक होण्यास भारतीय दलित पॅंथरने भाग पाडलं होतं.

मुंबई, उल्हासनगर, पुणे या तीन ठिकाणी आणि नागपूर, अमरावती, येथे वर्धापन दिनाचा कार्यक्रम करायचा आहे. पॅंथरचा इतिहास मुक्तीच्या लढ्याला बळ देणारा राहिला आहे. ईट का जवाब पत्थर से देण्याची भूमिका पॅंथरची होती. ती पॅंथर पुन्हा सुरू करावी, अशी मागणी देशभरातून माझ्याकडे येत आहे. अनेकांची ती इच्छा आहे. सर्वांशी चर्चा करून रिपाइं युवकांची संघटना म्हणून दलित पॅंथरची निर्मिती व्हावी, असेही आठवले म्हणाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com