आजरा परिसरात टस्कराचा धुमाकूळ

आजरा तालुक्यात दोन टस्कर वावरत आहेत. यापैकी एकाने सुळेरान परिसरात, तर दुसऱ्याने आजऱ्यानजीक धुमाकूळ घातला आहे.
Elephant Rampage
Elephant RampageAgrowon

आजरा, जि. कोल्हापूर ः आजरा तालुक्यात दोन टस्कर (Tuskar Elephant Azra) वावरत आहेत. यापैकी एकाने सुळेरान परिसरात, तर दुसऱ्याने आजऱ्यानजीक धुमाकूळ (Elephant Rampage) घातला आहे. त्यांच्या उपद्रवाने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

Elephant Rampage
Crop Damage Survey : अतिवृष्टी होऊनही पंचनाम्यांकडे काणाडोळा

एका टस्कराने सुळेरानपैकी डोंगरवाडी परिसरात ठिय्या दिला आहे, तर दुसरा आजऱ्यानजीक रामतीर्थ परिसरात आला आहे. त्यांना रोखावयाचे कसे, या चिंतेत वन विभाग असून त्यांची चांगलीच कसरत होत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गडदुवाडी परिसरात गेलेला टस्कर परतला आहे. तो गेले आठवडाभर सुळेरानपैकी डोंगरवाडी परिसरात तळ ठोकून आहे. त्याने या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिके फस्त केली असून, त्याला आवरणे कठीण बनले आहे. बाबूराव पाटील, संभाजी पाटील, जयवंत डेळेकर, कृष्णा शेळे या शेतकऱ्यांच्या भात, नागली, ऊस पिकांचे टस्कराने नुकसान केले आहे.

Elephant Rampage
Crop Damage Compensation : अतिवृष्टीचे १३० कोटी वितरित

हत्तीच्या त्रासाला येथील शेतकरी कंटाळले आहेत. त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वन विभागाकडे करीत आहेत. त्याला या परिसरातून हुसकावून लावावे, अशी मागणीही जोर धरू लागली आहे. हाळोली परिसरात मुक्काम ठोकलेला टस्कर रामतीर्थ परिसरात परतला असून, येथील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान करीत आहे. त्याचा वावर आजरा शहरानजीक आहे.

टस्कराचा कायमचा बंदोबस्त करा

टस्कराचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने प्रयत्न करावेत. हत्ती संगोपन केंद्र करावे किंवा त्याला या परिसरातून हुसकावून लावावे. कोणतीही ठोस उपाययोजना करावी. नाहीतर शेतीच उद्‌ध्वस्त होईल, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी बाबूराव महादेव पाटील यांनी व्यक्त केली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com