Dr. Babasaheb Ambedkar : राष्ट्रीय भवन प्रस्ताव लालफितीत

कसारा येथे डॉ. बाबासाहेबांच्या समता आंदोलनाच्या स्मृती
Dr. Babasaheb Ambedkar
Dr. Babasaheb AmbedkarAgrowon

खर्डी : १८ फेब्रुवारी १९३३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी शहापूर तालुक्यातील कसारा येथे सामाजिक समता आंदोलन केले होते. या ऐतिहासिक जागर जागवलेल्या स्थळाचे राष्ट्रीय सामाजिक भवनात रूपांतर करण्याच्या हेतूने प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी कसारा येथील शिल्पकार सामाजिक प्रबोधन संस्थेचे अध्यक्ष रमाकांत पालवे यांनी ५० गुंठे भूखंडाची मागणी केली होती; मात्र कार्यवाहीअभावी हे भवन लालफितीत अडकले आहे.

Dr. Babasaheb Ambedkar
पुण्यात नवे कृषी भवन 

याबाबत तत्कालीन समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले यांनी सदर जागेचे महसुली कागदपत्रे उपलब्ध करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते; परंतु पाच वर्षे झाले तरी राष्ट्रीय स्मारक भवन होण्याबाबत शासकीय स्तरावर कोणत्याही हालचाली होत नसल्याने येथील शिल्पकार सामाजिक प्रबोधन संस्थेचे अध्यक्ष रमाकांत पालवे व आरपीआयचे कसारा विभागीय अध्यक्ष देवीदास भोईर यांनी हे भवन लवकरात लवकर व्हावे यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लवकरच रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Dr. Babasaheb Ambedkar
Lokseva Ayog : नवी मुंबईत होणार लोकसेवा आयोग भवन ः डॉ. दिघावकर

कसाऱ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेल्या जाहीर सभेच्या जागेवर राष्ट्रीय सामाजिक भवन व्हावे यासाठी रमाकांत पालवे आग्रही असून गेल्या पाच वर्षांपासून ते शासन स्तरावर या स्मारकप्रश्नी पाठपुरावा करत आहेत. याबाबत ७ एप्रिल २०१७ रोजी विधानसभागृहात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. मौजे मोखावणे येथे समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांनी प्रत्यक्ष भेट देऊन स्थळपाहणी केली आहे. त्यानुसार खात्याच्या सहायक आयुक्तांनी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक

बांधकाम विभाग ठाणे यांना पत्रान्वये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक बांधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची निवासस्थाने व गोडाऊन असलेली जागा उपलब्ध करून द्यावी, असे आदेश दिल्याचे रमाकांत पालवे यांनी सांगितले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १८ फेब्रुवारी १९३३ रोजी कसारा येथे जाहीर सभा घेतली होती; परंतु त्याआधी आणि नंतरदेखील समता चळवळीच्या निमित्ताने डॉ. आंबेडकरांचे कसाऱ्यात अनेकदा येणे झाले होते. त्यामुळे येथील जनतेचे त्यांच्याशी भावनिक नाते असल्याने डॉ. आ़ंबेडकरांनी घेतलेल्या जाहीर सभेचा येथील रहिवासी दरवर्षी वर्धापनदिन उत्साहात साजरा करतात, असे सरपंच प्रकाश वीर यांनी सांगितले.

कसाऱ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन निर्मितीचे गेल्या ५ वर्षांत शासन स्तरावर त्याबाबत कोणताही पाठपुरावा झाला नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेतील गोडाउन व निवासस्थाने यांची दुरवस्था झाली आहे. ती जागा लवकरात लवकर रिकामी करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी उपलब्ध करून द्यावी.

- देविदास भोईर,

अध्यक्ष, आरपीआय, कसारा

कसारा येथे डाॅ. बाबासाहेबांनी समता आंदोलन केले होते. यासाठी तेथे राष्ट्रीय स्मारक होण्याची मागणी होत आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करणार.

- अशोक शिनगारे, जिल्हाधिकारी, ठाणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com