निमगाव केतकीत होणार ‘रास्ता रोको’ आंदोलन

नीरा डावा कालवा अस्तरीकरणाच्या आदेशाचा बुधवारी (ता. २४) निमगाव केतकी येथे शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केला.
Nira Canal
Nira CanalAgrowon

निमगाव केतकी, जि. पुणे : नीरा डावा कालवा अस्तरीकरणाच्या आदेशाचा बुधवारी (ता. २४) निमगाव केतकी येथे शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केला. या निर्णयाच्या विरोधात शनिवारी निमगाव केतकी येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.

Nira Canal
Crop Damage : अतिवृष्टीने शेतीसह पिकांची दैना

सुवर्णयुग गणेश मंदिरात झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी कालवा अस्तरीकरण या विरोधात निषेध व्यक्त केला. या वेळी जिल्हा सुकाणू समितीचे अध्यक्ष अँड. श्रीकांत करे म्हणाले, की शहरांना व उद्योगांच्या गरजा भागवण्यासाठी शेतकऱ्यांचे पाणी पळविण्याचा हा घाट घातला आहे. त्यामुळे या विरोधात तीव्र लढा उभा करावा लागणार आहे. अस्तरीकरणामुळे फक्त शेतकऱ्यांचाच तोटा होणार नाही तर कालव्याच्या परिसरातील जैवविविधता देखील धोक्यात येणार आहे. पर्यावरणाची फार मोठी हानी होणार आहे. त्यामुळे शासनाने त्यांचा निर्णय रद्द करावा.

Nira Canal
Crop Damage : अतिवृष्टिग्रस्तांना वाढीव दराने भरपाईचा आदेश

शेतकरी संघटनेचे मंगेश मंगेश घाडगे, बहुजन मुक्ती पक्षाचे इंदापूर तालुकाध्यक्ष बाबासो भोंग, इंदापूर आम आदमी पार्टीचे प्रमुख बिभीषण लोखंडे यांनी तीव्र शब्दात शासनाच्या निर्णयाचा निषेध केला. यावेळी सर्वनुमते शनिवारी २७ ऑगस्ट रोजी निमगाव केतकी या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या वेळी मच्छिंद्र चांदणे, दशरथ डोंगरे, बापूराव घाडगे, विजय महाजन, दादासाहेब किरकत, संदीप भोंग, संतोष राजगुरू, हर्षवर्धन पाटील, महादेव पाटील, गोपाळ भोंग, दादाराम आदलिंग, दादा भिसे अनंता गटकुळ, धनंजय राऊत, विलास मिसाळ, विनायक पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com