पीकविमा परताव्यासाठी परभणीत ‘रास्ता रोको’

स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon

परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत गतवर्षीच्या (२०२१) खरीप हंगामातील थकीत पीकविमा परतावा तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे मंगळवारी (ता. १७) परभणी येथे परभणी वसमत राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले

गतवर्षीच्या खरीप हंगामातील पीकविम्याची रक्कम अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. राज्य व केंद्र सरकारने पीक विमा कंपनीला त्यांच्याकडील हप्त्याची रक्कम जमा केली आहे. पीक कापणी प्रयोगात जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळे उंबरठा उत्पादनामध्ये नुकसानीत पात्र आहेत.

सातत्याने मागणी करूनही अद्याप रिलायन्स विमा कंपनीने पीकविम्याच्या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेल्या नाहीत. त्यामुळे करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, भास्कर खटिंग, मुंजाभाऊ लोडे, केशव आरमळ, प्रभाकर शेरे, बाळासाहेब चोखट, अनंता डुबे, गजानन तुरे, विठ्ठल चोखट, प्रभाकर शेरे, माउली शिंदे, लखन डुबे, सोमेश्‍वर खनपटे, विनोद राठोड, मुंजाजी राऊत, अजित चोखट, बाबूराव खनपटे, संजय चोखट आदींसह शेतकरी, कार्यकर्ते सहभागी झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com