Gold Rate : सोन्याची झळाळी वाढली ; जळगावात प्रतितोळा दर विक्रमी ६३ हजारांच्या पार

सुवर्णनगरी जळगावात सोनाच्या दराने उच्चांकी दर गाठला आहे. जळगावात सोन्याच्या दरांनी ६३ हजार रुपयांचा टप्पा पार केला आहे.
Gold Market Rate
Gold Market RateAgrowon

Latest Gold Rate : सुवर्णनगरी जळगावात सोनाच्या दराने (Gold Rate Jalgaon) उच्चांक गाठला आहे. जळगावात सोन्याच्या दरांनी ६३ हजार रुपयांचा टप्पा पार केला आहे. देशात आधीच महागाईच्या (Inflation) झळांनी सामान्य जनता होरपळली आहे. अशातच सोने खरेदीही महागली आहे.

एकीकडे लग्न सराईचे दिवस आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक अक्षय्य तृतीयेचा सण तोंडावर असताना सोन्याचे दर वाढल्याने सोने खरेदीची स्वप्न पाहणाऱ्यांची चिंता वाढली आहे.

सोन्याच्या दरांनी आजपर्यंतची सर्वात विक्रमी भावपातळी गाठली आहे. अलिकडच्या काही घटनांतून अनेक गुंतवणूकदार हे सोन्यामध्ये सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहत आहेत.

Gold Market Rate
Cotton Market : कापूस निर्यात खरचं कमी राहणार का?

त्यामुळे अनेक गुंतवणुकदार सोने गुंतवणुकीकडे वळाले आहेत. परिणामी सोन्याच्या मागणीत मोठी वाढ झाल्याने दरात उच्चांकी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

ऐन लग्न सराईच्या दिवसांत सोन्याचे दर ६३ हजार ३०० रुपयांवर पोहचले आहेत. सोने खरेदी सर्व सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने याचा परिणाम सोने खेरदीवर झाल्याचे दिसत आहे.

Gold Market Rate
Gold Price: सोन्याच्या किंमतीत वाढ; सोने पोहचले ६० हजारावर

गेल्या महिन्याभारत सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. जागतिक पातळीवर अमेरिकन फेडरल बँकांच्या व्याज विषयक धोरणांतील बदलांमुळे गुंतवणुकदारांचा कल सोन्याच्या गुंतवणुकीकडे वाढल्याचे दिसत आहे.

दरम्यान, भारतातही लग्न सराई आणि सणांमुळे सोन्याची मागणी वाढल्यामुळे दर वाढल्याचे सोने व्यापारी सांगतात. गेल्या २४ तासांत सोन्याच्या दरांत मोठी वाढ झाली आहे. सोन्याचे दर ६२ हजार ८०० वरून ६३ हजार ३०० रुपये प्रतितोळा पोहोचले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com