
सांगली ः ‘जलजीवन मिशन’ (Jaljeevan Mission) अभियानांतर्गत ग्रामीण भागातील कुटुंबांना नळाद्वारे नियमित पाणीपुरवठा (Water Supply) करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
मार्च २०२४ पर्यंत संपूर्ण जिल्हा ‘हर घर नल से जल’ म्हणून घोषित करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी प्रजासत्ताक दिनी (Republic Day) आयोजित ग्रामसभेत (Gramsabha) ‘जलजीवन मिशन’च्या कामांचे वाचन आणि त्यावर चर्चा केली जाईल.
या बाबत योग्य कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले.
केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातून २०१९ पासून ‘जलजीवन मिशन’ हा एक महत्त्वांकाक्षी प्रकल्प सुरू केला आहे.
या अंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. उद्या (ता.२६) होणाऱ्या ग्रामसभेमध्ये ग्राम आरोग्य पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या सदस्यांना आमंत्रित करून विशेष स्थान देण्यात येईल.
समिती सदस्यांची ओळख तसेच त्यांच्या अधिकार व जबाबदारीबाबत उपस्थितांना माहिती देण्यात येईल. पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षणांतर्गत पाणी गुणवत्ता चाचणीसाठी प्रशिक्षित करण्यात आलेल्या महिलांना सभेस आमंत्रित करून सन्मानित करण्यात येईल.
या महिलांची संपर्क क्रमांकासहीत नावे गावातील सार्वजनिक ठिकाणी ठळकपणे प्रसिद्ध करण्यात येतील जेणेकरून त्यांचा उत्साह वाढीस लागून पाणी गुणवत्ता राखण्याच्या अनुषंगाने गाव स्वयंनिर्भर होईल.
ग्रामसभेत जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर योजनेची सविस्तर माहिती देण्यात येईल.
त्याअनुषंगाने चर्चा घडवून आणली जाईल. योजनेअंतर्गत गावातील पाणीपुरवठा सुविधांच्या अनुषंगाने आवश्यक जमा करावयाचा समुदायाचा वाटा (लोकवर्गणी ५% किंवा १०%), जमा झालेली रक्कम व उर्वरित जमा करावयाची रक्कम याबाबत आवश्यक कृती योजना आखण्यावाबत चर्चा केली जाईल.
ज्या ठिकाणी योजनेची भौतिक कामे अंतिम टप्प्यात आहेत अशी गावे ‘हर घर नल से जल’ म्हणून घोषित करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.