Mpsc Exam: 'एमपीएससी'च्या ८१६९ पदांसाठी होणार भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) ८ हजार १६९ पदे भरली जाणार आहेत.
Mpsc Exam
Mpsc ExamAgrowon

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) (Mpsc Exam) शुक्रवारी (ता.२०) रोजी पदांची जाहिरात प्रसिद्ध केली. या भरतीत गट 'ब' आणि 'क' संवर्गातील ८ हजार १६९ पदे भरली (MPSC Recruitment) जाणार आहेत.

३० एप्रिल २०२३ रोजी संयुक्त पूर्व परीक्षेचे आयोजन एमपीएससीच्या वतीने जिल्हा केंद्रांवर करण्यात येणार आहे.

राज्यातील ३७ केंद्रांवर परिक्षा होणार आहे. तर महाराष्ट्र अराजपत्रित गट 'ब' सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २ सप्टेंबर २०२३ रोजी होणार आहे. तसेच महाराष्ट्र गट 'क' सेवा संयुक्त मुख्य परीक्षा ९ सप्टेंबर २०२३ रोजी पार पडणार आहे.

सरकारने जाहिर केलेल्या जाहिरातीत सर्वाधिक पदे ही लिपीक व टंकलेखक संवर्गातील आहेत. बुधवारपासून (ता.२५) विद्यार्थ्यांना आयोगाच्या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहेत. या पदभरतीसाठी वयोमर्यादा १ मे २०२३ पर्यंतची गृहीत धरण्यात येणार आहे.

Mpsc Exam
एमपीएससी’च्या दुय्यम सेवा  अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत 

दरम्यान, एमपीएससीचा अभ्यासक्रम बदलल्यामुळे विद्यार्थ्यांनी त्याविरोधात पुण्यात मागील काही दिवसांपूर्वी आंदोलन केले होते.

तसेच जोपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अभ्यासक्रमाबाबत आश्वासन देत नाहीत, तोवर आंदोलन मागे घेणार नाही, असा पावित्रा विद्यार्थ्यांनी घेतला होता. मात्र मुख्यमंत्री शिंदेंनी आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले होते. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com