PDKV Akola : ‘पंदेकृवि’त वरीष्ठ संशोधन सहायक पदासाठी सरळसेवेने भरती करावी

या बाबत उमेदवारांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामार्फत २०१७ साली या पदासाठी २०० गुणांची लेखी परीक्षा (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी) घेऊन भरती प्रक्रिया सरळसेवेमार्फत पूर्ण करण्यात आली होती.
PDKV AKOLA
PDKV AKOLA Agrowon

Akola News अकोला ः येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये (PDKV Akola) वरिष्ठ संशोधन सहायक पदासाठीची भरती प्रक्रिया ही २०० गुणांची लेखी परीक्षा (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी) घेऊन सरळसेवेमार्फत पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी उमेदवारांकडून करण्यात आली आहे.

या पदांची भरती १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करायची असल्याने तातडीने या बाबत पाऊले उचलण्याची गरजही व्यक्त केली जात आहे.

या बाबत उमेदवारांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामार्फत २०१७ साली या पदासाठी २०० गुणांची लेखी परीक्षा (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी) घेऊन भरती प्रक्रिया सरळसेवेमार्फत पूर्ण करण्यात आली होती.

आता ४ मे २०२२ च्या शासन निर्णयान्वये गट ‘ब’ व गट ‘क’ पदाची भरती प्रक्रिया ही २०० गुणांची लेखी (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी) परीक्षा घेऊन सरळसेवेमार्फत पूर्ण करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

PDKV AKOLA
PDKV Convocation : विद्यार्थ्यांना ४३२७ पदव्यांचे होणार वितरण ः डॉ. गडाख

३० सप्टेंबर २०२२ च्या शासन निर्णयानुसार ८० टक्के पदभरती करण्यासाठी राज्य शासनाने सूट दिली असून, ही पदभरती १५ ऑगस्ट २०२३ पूर्वी पूर्ण करायची आहे. त्यामुळे शक्य तितक्या लवकर वरिष्ठ संशोधन सहायक, कनिष्ठ संशोधन सहायक व कृषी सहायक पदासाठीची जाहिरात प्रसिद्ध करून भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी उमेदवारांकडून केली जात आहे.

PDKV AKOLA
PDKV News : ‘पंदेकृवि’चे केंद्र देशात सर्वोत्कृष्ट

कार्यकारी परिषद सदस्यांचीही सूचना

वरिष्ठ संशोधन सहायक व कनिष्ठ संशोधन सहायक या पदांसाठी लेखी परीक्षा घेण्याची सूचना कार्यकारी परिषद सदस्य आ. विप्लव बाजोरीया यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांना केली आहे.

बाजोरिया यांनी या पत्रात उमेदवारांची मागणी मांडत यापूर्वी २०१७ मध्ये परभणीच्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठात राबवलेल्या या परीक्षा पद्धतीचा दाखला दिला आहे. त्याच धर्तीवर शासन निर्णयाला अधिक राहत २०० गुणांची लेखी (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी) परीक्षा घेण्याबाबत पत्रात म्हटले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com