Nashik ZP : नाशिक जिल्हा परिषदेत २ हजार जागांची भरती

ग्रामविकास विभागाने राज्यातील जिल्हा परिषदांमधील गट ‘क’ संवर्गातील रिक्त जागांपैकी ८० टक्के जागा भरण्यासाठी भरतीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.
Zilla Parishad
Zilla ParishadAgrowon

नाशिक : ग्रामविकास विभागाने (Rural Development Department) राज्यातील जिल्हा परिषदांमधील गट ‘क’ संवर्गातील रिक्त जागांपैकी ८० टक्के जागा भरण्यासाठी भरतीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार नाशिक जिल्हा परिषदेत गट ‘क’ संवर्गातील दोन हजार ५३८ रिक्त जागांच्या ८० टक्के म्हणजे दोन हजार ३० जागा भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

याबाबत ग्रामविकास विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार १ ते ७ फेब्रुवारी २०२३ दरम्यान भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार असून, यासाठी निवड मंडळाच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.

Zilla Parishad
Crop Damage Compensation : मिळालेली भरपाईची मदत ‘ना थरीची, ना भरीची’

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात राज्य सरकार अंदाजे ७५ हजार सरळसेवा कोट्यातील जागा भरणार आहे. त्यात राज्यातील जिल्हा परिषदांमधील सहा हजारांवर जागांची भरती करण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेने रिक्त जागांचा अंतिम आराखडा राज्य शासनाकडे पाठविला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेत सर्व विभागांच्या गट ‘क’ व गट ‘ड’ या संवर्गाच्या दोन हजार ७२६ जागा रिक्त आहेत. यामध्ये दोन हजार ५३८ जागा या गट ‘क’मधील आहेत, तर १८८ जागा गट ‘ड’मधील आहेत.

ग्रामविकास विभागाने राज्यातील गट ‘क’ संवर्गातील रिक्त जागांच्या ८० टक्के जागा भरण्यासाठी जिल्हा परिषदांना मुभा दिली आहे. ग्रामविकास विभागाने गट ‘ड’ची रिक्त पदे भरण्यास परवानगी दिलेली नाही. केवळ गट ‘क’ संवर्गातील पदांची भरती करायची असल्यामुळे दोन हजार ५३८ रिक्त जागांच्या ८० टक्के जागांची भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून ही भरती प्रक्रिया रखडली होती. यात भरतीसाठी अर्ज मागवीत, ही प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. त्यामुळे बेरोजगारांमध्ये मोठी नाराजी होती.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com