
पुणे ः राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांमधील नोकरभरतीमधील (Bank Recruitment) ऑफलाइन पद्धत बंद करण्यात आली आहे. पारदर्शकता येण्यासाठी यापुढे ऑनलाइन प्रक्रिया राबविण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. (Online Bank Exam)
जिल्हा बॅंकांमधील नोकरभरतीसाठी झालेल्या ऑफलाइन परीक्षांमध्ये उत्तरपत्रिका व गुणतक्त्यांमध्ये बाहेरील यंत्रणेचा हस्तक्षेप होत असल्याचे उघड झाले होते. त्यामुळे ऑनलाइन प्रणालीच्या माध्यमातून भरती प्रक्रियेत सुटसुटीतपणा व पारदर्शकता येण्यासाठी सहकार आयुक्तांनी शासनाला प्रस्ताव सादर केला होता. त्यामुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम ६९ अ (१) नुसार असलेल्या अधिकारात आता काही सुधारणा करण्यास शासन तयार झाले आहे.
ऑनलाइन भरतीतून काही पदे वगळण्यात आली आहेत. त्यात सुरक्षारक्षक, वाहनचालक तसेच व्यवस्थापन, मध्य व्यवस्थापन व कनिष्ठ व्यवस्थापनातील पदे, विशेष व तांत्रिक पदांचा समावेश आहे. ऑनलाइन नोकरभरतीसाठी योग्य असलेल्या संस्थांची तालिका (पॅनेल) सहकार आयुक्त तयार करतील. त्यात राज्य सहकारी बॅंक्स असोसिएशन, इंडियन बॅंक असोसिएशन, भारतीय बॅंकिंग मनुष्यबळ निवड यंत्रणेचा समावेश असेल.
...असे आहेत शासनाचे आदेश
- नोकरभरतीसाठी निवडलेली संस्था नोंदणीकृत असावी
- ऑनलाइन नोकरभरतीचा तीन वेळेचा अनुभव असावा
- आवश्यक मनुष्यबळ असावे
- या संस्थेची पार्श्वभूमी चुकीचे व्यवस्थापन, गैरव्यवहार, गुन्हेगारी स्वरूपाची नसावी
- एखाद्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात परीक्षा घ्यायच्या असल्यास त्या मोठ्या जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा सत्र पद्धतीनेही घेता येतील.
- परीक्षांची काठिण्यपातळी सर्वत्र समान असेल
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.