Kerala Rain : केरळमध्ये दहा जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’ जारी

राजस्थान, गुजरातनंतर पावसाने आपला मोर्चा दक्षिणेकडे वळविला असून केरळमध्ये संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून नद्यांच्या पातळीतही वाढ झाली आहे.
Kerala Rain
Kerala RainAgrowon

तिरुअनंतपुरम (वृत्तसंस्था) ः राजस्थान, गुजरातनंतर पावसाने आपला मोर्चा दक्षिणेकडे वळविला असून केरळमध्ये संततधार पावसामुळे (Kerala Rain) अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या (land Slide) असून नद्यांच्या पातळीतही वाढ झाली आहे. हवामान खात्याने (Weather Department) राज्यात मंगळवारी तसेच बुधवारी (ता. ३) दहा जिल्ह्यांना अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ (Heavy Rain Red Alert) जारी केला आहे. राजधानी तिरुअनंतपूरमसह कोल्लम, कासारगोड आदी जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. दरम्यान, केरळमध्ये पाच तारखेपर्यंत सर्वदूर पावसाची तसेच तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.

Kerala Rain
Cotton Sowing: देशात यंदा विक्रमी कापूस लागवडीची शक्यता | Cotton Market |ॲग्रोवन

हवामान खात्याने दिलेल्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पी. विजयन यांनी नागरिकांना काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सूचना पाळण्याचाही सल्ला दिला आहे. संततधार पावसाने कन्नूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून सोमवारी (ता. १) रात्री अडीच वर्षीय बालिकेसह दोघांचा मृत्यू झाला.

Kerala Rain
Soybean : पिवळ्या मोझॅक रोगाचा सोयाबीनवर प्रादुर्भाव

आणखी एकजण बेपत्ता आहे. पावसाचा वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला असून कन्नूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी थलासेरी तालुक्यातील शिक्षणसंस्थांना सुटी जाहीर केली. पावसामुळे इडुक्की जिल्ह्यातील पोनमुंडी, कुंडाला, कल्लारकुट्टी, इरट्ट्यार आणि लोअर पेरियार या पाच धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे, पल्लक्कड जिल्ह्यातील मीनकारा आणि मंगलम ही दोन धरणेही भरली आहेत.

पूरग्रस्तांसाठी मदत छावण्या

- एर्नाकुलम जिल्ह्यात पुरामुळे कोडनाड हत्ती अभयारण्याजवळ अडकलेल्या पर्यटकांची ‘एनडीआरफ’कडून सुखरूप सुटका

- थ्रिसूर किनाऱ्याजवळ समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या दोन मच्छीमारांचा तटरक्षक दलाकडून शोध सुरू

- राज्य सरकारने विविध जिल्ह्यांत उघडलेल्या ४९ मदत छावण्यात ८०० पूरग्रस्तांचा आश्रय

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com