Weather Update : कोकण, घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’ कायम

कोकण, घाटमाथा, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. आज (ता. ८) कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे.
Weather Update
Weather UpdateAgrowon

पुणे : कोकण, घाटमाथा, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर (Rain Force Increase In Dam Catchment Area) वाढला आहे. आज (ता. ८) कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा (Heavy Rain Prediction) (रेड अलर्ट) देण्यात आला आहे. नाशिक, चंद्रपूरात ही जोरदार पावसाचा इशारा आहे. तर उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने (Weather Update) वर्तविली आहे.

Weather Update
Soybean Sowing : सोयाबीनसाठी जोडओळ पेरणी पद्धती

दक्षिण पाकिस्तान आणि परिसरावर ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे असून, तो ठळक कमी दाब क्षेत्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. दक्षिण महाराष्ट्र ते उत्तर केरळपर्यंत किनाऱ्याला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. महाराष्ट्रामध्ये ३.१ किलोमीटर उंचीवर पूर्व-पश्चिम दिशेने वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोड क्षेत्र तयार झाले आहे. अरबी समुद्रावरून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने कोकण, घाटमाथ्यावर पाऊस वाढला आहे.

Weather Update
Kharif Sowing : पूर्व हवेलीत पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या

आज (ता. ८) मुंबईसह संपूर्ण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अतिजोरदार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) आहे. तर नाशिकचा घाटमाथा, चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

अतिजोरदार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) :

मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

नाशिक, चंद्रपूर

जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) :

नागपूर, धुळे, जळगाव, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com