Ujani Dam : उजनी धरणातून भीमा नदीतील विसर्गात घट

सोलापूर ः जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे उजनी धरणाकडे येणाऱ्या पाण्याचा विसर्ग कमी झाला आहे.
Ujani Water
Ujani WaterAgrowon

सोलापूर ः जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणाच्या (Ujani Dam) पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे उजनी धरणाकडे येणाऱ्या पाण्याचा विसर्ग (Water Inflow To Ujani Dam) कमी झाला आहे. तरीही धरणाच्या पाणी पातळीत (Dam Water Level) मात्र ११० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. दुसरीकडे उजनी धरणातून पुढे भीमा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग आता कमी करण्यात आला आहे. सोमवारी (ता. २४) धरणातून भीमेत केवळ दहा हजार क्युसेक इतका विसर्ग सोडण्यात येत होता.

Ujani Water
Ujani Dam : ‘उजनी’ तून ‘भीमे’त विसर्ग कायम

गेल्या पाच-सहा दिवसांपासून उजनी धरणाच्या वरच्या बाजूच्या पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात मोठा पाऊस झाला. त्यामुळे या भागातील अतिरिक्त पाणी उजनी धरणाकडे सोडण्यात येत होते. परंतु धरणाची पाणी पातळी आधीच १०८ टक्क्यांपर्यंत होती. त्यात या पाण्यामुळे उजनी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली. सोमवारी (ता.२४) धरणाची एकूण पाणी पातळी ४९७.३०५ मीटरपर्यंत पोचली. तर एकूण पाणीसाठा १२२.९७ टीएमसी आणि त्यापैकी उपयुक्त साठा ५९.३१ टीएमसी एवढा राहिला. तर पाण्याची टक्केवारी ११०.७१ टक्केपर्यंत पोचली. गेल्या पाच दिवसांत दोन टक्क्यांनी पातळीत वाढ झाली.

‘भीमा’त १० हजार क्युसेक विसर्ग

धरणातील या विसर्गामुळे पुढील पूरस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी उजनी धरणातून पुढे भीमा नदीतही जवळपास ५० हजाराहून अधिक क्युसेक इतका विसर्ग सोडण्यात येत होता. पण गेल्या दोन दिवसांत पाऊस थांबल्याने वरचा विसर्ग कमी झाल्याने आता पुढचा विसर्गही कमी करण्यात आला आहे. सध्या धरणातून केवळ १० हजार क्युसेक विसर्ग भीमा नदीत सोडण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com