धरणांतील पाण्याच्या आवकेत घट

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. यामुळे धरणातील पाण्याच्या आवकेत काही प्रमाणात घट झाली आहे.
Dam Water
Dam Water Agrowon

पुणे : धरणाच्या पाणलोट क्षेत्रात (Dam Catchment Area) पावसाचा जोर (Rain Intensity) काहीसा कमी झाला आहे. यामुळे धरणातील पाण्याच्या आवकेत (Water Arrival In Dam) काही प्रमाणात घट झाली आहे. बुधवारी (ता.२७) सकाळी आठ वाजेपर्यंत धरणांत २.९७ टीएमसी एवढी नव्याने पाण्याची आवक झाली आहे. पावसाची अशीच स्थिती पुढील काही दिवस राहिल्यास पाण्याच्या आवकेत आणखी घट होण्याची शक्यता आहे.

Dam Water
Dam Water : हतनूर, गिरणातून पाण्याचा विसर्ग कायम

गेले दोन महिने पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. यामध्ये जूनमध्ये कमी-अधिक स्वरूपात पाऊस पडल्याने धरणांत फारशी आवक झालेली नव्हती. परंतु जुलै महिन्यात पावसाने चांगलाच जोर धरला होता. त्यातच घाटमाथ्यावरही मुसळधार पाऊस बरसल्याने धरणांत नव्याने पाण्याची आवक सुरू झाली होती. सुरुवातीला आवक कमी होती. मात्र जसजसे पावसाचे प्रमाण वाढत गेले, त्यानुसार धरणांतील पाण्याच्या आवकेत वाढ होत गेली. प्रामुख्याने ७ ते २० जुलै या कालावधीत धरणांत पाण्याची चांगलीच आवक झाली. १४ जुलै रोजीच्या चोवीस तासांत धरणांत सर्वाधिक १८.१९ टीएमसीपर्यंत पाण्याची आवक झाली होती. त्यानंतर १५ जुलै रोजी १७.८६ टीएमसी पाण्याची आवक झाली. त्यामुळे जिल्ह्यातील २६ धरणांतील पाणीपातळी झपाट्याने वाढत गेली.

Dam Water
Ujani Dam : उजनी धरणाची पाणी पातळी ७० टक्क्यांकडे

यंदा एक जून ते २७ जुलै या कालावधीत मुळशीच्या घाटमाथ्यावर सर्वाधिक चार हजार १७ मिलिमीटर पाऊस पडला. तर वळवण दोन हजार १७२, ठोकरवाडी एक हजार ६७४, शिरोटा एक हजार ३५१ मिलिमीटर पाऊस पडला. याशिवाय टेमघर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात एक हजार ८१४ मिलिमीटर, वरसगाव एक हजार ४२१, पानशेत एक हजार ४५४, पवना एक हजार ५८०, वडिवळे एक हजार ५६७, कळमोडी एक हजार ८२, गुंजवणी एक हजार ३५१, नीरा देवघर एक हजार २१२ मिलिमीटर पाऊस पडला. तर माणिकडोह ८७६, डिंभे ७४३, भाटघर ४७८, वीर २४१, पिंपळगाव जोगे ४६७, येडगाव ५२५, वडज ४५७, चिल्हेवाडी ४२४, आंध्रा ७७४, कासारसाई ५९७, भामा आसखेड ६००, चासकमान ५६८, शेटफळ १६३, नाझरे १७९, वीर १६४, उजनी २७८, घोड १२२, विसापूर ५६ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे धरणांत चांगलीच आवक झाल्याने जवळपास चार धरणे भरली आहे. तर काही धरणांत ५० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला आहे.

बुधवारी (ता.२७) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये धरणनिहाय झालेली पाण्याची आवक (टीएमसीमध्ये)

टेमघर ०.०१, वरसगाव ०.१२, पानशेत ०.१०, खडकवासला ०.०८, पवना ०.०९, कासारसाई ०.०१, कळमोडी ०.०३, चासकमान ०.११, भामा आसखेड ०.०४,

आंध्रा ०.०३, शेटफळ ०.०१, गुंजवणी ०.०२, भाटघर ०.२२, नीरा देवघर ०.०९, वीर ०.२०, पिंपळगाव जोगे ०.०३, माणिकहोड ०.०६, येडगाव ०.११, वडज ०.०१,

डिंभे ०.१६, चिल्हेवाडी ०.०७, घोड ०.२०, विसापूर ०.०२, उजनी १.१५, मुळशी ०.१९.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com