जिल्हा सहकारी बॅंकेच्‍या विविध कर्ज व्याजदरात कपात

पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बॅंकेच्या विविध कर्ज आणि व्याजरचनेत पुनर्रचना करण्यात आली असून, विविध कर्जमर्यादा वाढविण्यात आल्या आहेत.
PDCC Bank
PDCC BankAgrowon

पुणे ः पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बॅंकेच्या (PDCC Bank) विविध कर्ज आणि व्याजरचनेत पुनर्रचना (Various Loan Interest Rate) करण्यात आली असून, विविध कर्जमर्यादा (Loan Limit) वाढविण्यात आल्या आहेत. तर व्याजदरात (Interest Rate) कपात करण्यात आल्याची माहिती बँकेचे ज्येष्ठ संचालक आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शनिवारी (ता.१३) पत्रकार परिषदेमध्ये दिली. या वेळी बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे उपस्थित होते.

PDCC Bank
Ajit Pawar : दहा लाख हेक्टरचे नुकसान; तरीही भरपाई नाही

या वेळी अजित पवार म्हणाले, ‘‘बॅंकांमधील ठेवींवरील व्याजदरात मोठी कपात होत आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात कपात होत नाही. हा कर्जदारांवर अन्याय आहे. यामुळे पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बॅंकेच्या वतीने विविध कर्जांवरील व्याजात १ टक्का कपात करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. यामुळे आता नोकरदारांसाठीची कॅश क्रेडिट कर्ज मर्यादा १५ लाखांवरून २० लाख रुपये करण्यात आली असून, व्याज दर ११ टक्क्यांवरून १० टक्के करण्यात आला आहे. तर, देशांतर्गत शिक्षणासाठीची तारण कर्ज मर्यादा १५ लाखांवरून ३० लाख आणि परदेशी शिक्षण कर्ज मर्यादा २५ लाखांवरून ४० लाख एवढी करण्यात आली आहे. तर या कर्जाच्या व्याजदरात एक टक्क्यांनी कपात करण्यात आली असून, हे कर्ज आता ६ टक्के व्याजदराने मिळणार आहेत.’’

PDCC Bank
Ajit Pawar : विकासकामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही

गृहकर्जाची मर्यादा ३० लाखांवरून ७५ लाख एवढी करण्यात आली असून, त्याच्याही व्याजदरात ९ टक्क्यांवरून ८ टक्के करण्यात आले आहे. तर फळबागा, सौर कृषिपंपासाठी देखील कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे पवार यांनी या वेळी सांगितले.

कृषी पर्यटनासाठी ४० लाखांचे कर्ज

ग्रामीण भागात कृषिपूरक उद्योग असलेल्या कृषी पर्यटनासाठी आता ४० लाख रुपयांचे कर्ज विविध कार्यकारी सोसायटीमार्फत दिले जाणार आहे.

विकास सोसायट्या पुनर्वसनासाठी १० कोटींची तरतूद

जिल्ह्यात १३ तालुक्यांमध्ये १ हजार ३०६ विकास सोसायट्या आहेत. यापैकी १७३ संस्था अनिष्ट तफावतींमध्ये आहे. याची रक्कम सुमारे ४७ कोटी ९८ लाख एवढी असून, कमकुवत सोसायटी पुनर्वसन करण्यासाठी बॅंकेच्या वतीने १० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com