धरणांतील पाण्याच्या विसर्गात घट

पावसाचा जोर ओसरला असला तरी धरणांत पाण्याची अजूनही आवक सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक धरणांतील पाण्याच्या विसर्गात घट केल्याने नद्यांची पाणीपातळी कमी झाली आहे.
Ujani Dam
Ujani DamAgrowon

पुणे : पावसाचा जोर (Rain Intensity) ओसरला असला तरी धरणांत पाण्याची अजूनही आवक (Water Arrival In Dam) सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक धरणांतील पाण्याच्या विसर्गात (Water Discharge From Dam) घट केल्याने नद्यांची पाणीपातळी कमी झाली आहे. पावसाने उघडीप दिली असली तरी शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न काही प्रमाणात सुटण्यास मदत झाली आहे.

Ujani Dam
Dam Water : हतनूर, गिरणातून पाण्याचा विसर्ग कायम

गेल्या जुलै महिन्यात जिल्ह्याच्या विविध भागांत जोरदार पाऊस झाला. धरणांतील पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली. आतापर्यंत तीन धरणे शंभर टक्के भरली आहेत, तर सात धरणे भरण्याच्या मार्गावर असून, या धरणांत ८० टक्क्यांहून अधिक पाण्याचा साठा झाला आहे. मात्र मागील दहा ते बारा दिवसांपासून पावसाने चांगलीच उघडीप घेतली आहे. मंगळवारी (ता.२) सकाळी आठ वाजपर्यंत वडिवळे आणि मुळशी धरणांच्या पाणलोट क्षेत्र वगळता टेमघर, वसरगाव, पानशेत, खडकवासला, पवना, कासारसाई, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर, पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, वडज या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने चांगलीच विश्रांती घेतली आहे. तर, शेटफळ, नाझरे, वीर, चिल्हेवाडी, घोड, डिंभे, विसापूर आणि उजनी या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात ढगाळ वातावरणासह अधूनमधून उन्हाची स्थिती कायम होती.

Ujani Dam
Ujani Dam : उजनी यंदा बारा दिवस आधीच ५० टक्क्यांवर भरले

आगामी काळात पाणी उपलब्ध होण्यासाठी, तसेच पावसाने उघडीप दिल्यामुळे धरणांतील पाण्याच्या विसर्गात घट करण्यात आली आहे. सध्या वीर धरणातून डाव्या व उजव्या कालव्याला सर्वाधिक एक हजार ६५३ क्युसेकने पाण्याचा विसर्ग कानंदी नदीत सुरू आहे. तर खडकवासला धरणातून उजव्या आणि डाव्या कालव्याला एक हजार ५१० क्युसेक, पवनातून ५०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग पवना नदीत सोडण्यात आला आहे.

चासकमान धरणातून डाव्या कालव्याला १५० क्युसेकने पाण्याचा विसर्ग भीमा नदीला सोडण्यात आला आहे. येडगाव धरणातून डाव्या कालव्याला १४०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग कुकडी नदीत सोडण्यात आला आहे. चिल्हेवाडीतूनही २७२ क्युसेकने सांडव्याला पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. घोड धरणातूनही ७३५ क्युसेकने घोड नदीत पाणी सोडण्यात आले आहे. उजनीतून डाव्या कालव्याला ४५९ क्युसकने भीमा नदीला पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीतील पाण्याची पातळी बऱ्यापैकी कमी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com