जिल्ह्यातील धरणांतून पाण्याच्या विसर्गात घट

पावसाचा जोर ओसरला असला तरी धरणांत पाण्याची अजूनही आवक सुरूच आहे. पुणे जिल्ह्यातील २६ धरणांपैकी जवळपास २३ धरणांतून गेल्या काही दिवसांपासून सोडण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गात घट केली आहे.
Pune Dam Water
Pune Dam WaterAgrowon

पुणे : पावसाचा जोर (Rain Intensity) ओसरला असला तरी धरणांत पाण्याची अजूनही आवक (Water Inflow In Dam) सुरूच आहे. पुणे जिल्ह्यातील २६ धरणांपैकी जवळपास २३ धरणांतून गेल्या काही दिवसांपासून सोडण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गात (Water Discharge From Dam) घट केली आहे. तर खडकवासला, पानशेत, वरसगाव या धरणांतून नदीत सोडलेला विसर्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नद्यांतील पाण्याच्या पातळी काहीशी कमी झाली आहे.

Pune Dam Water
Rain : जिल्ह्यातील सोळा धरणे तुडुंब

गेल्या दहा ते पंधरा दिवसांपूर्वी जिल्ह्याच्या विविध भागांत जोरदार पाऊस झाला. धरणातील पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली. आतापर्यंत १४ धरणे शंभर टक्के भरली आहेत. तर आठ धरणांत ९० टक्क्यांहून अधिक भरली आहेत. तर चार धरणांत ७० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे. मात्र मागील आठवड्यापासून पावसाने चांगलीच उघडीप घेतली आहे. रविवारी (ता. २८) सकाळी आठ वाजेपर्यंत वडज आणि पिंपळगाव जोगे या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या तुरळक सरी पडल्या होत्या. उर्वरित धरणांच्या पाणलोट क्षेत्रात ढगाळ वातावरणासह अधूनमधून ऊन पडत होते.

Pune Dam Water
Rain : पावसाच्या उघडिपीमुळे धरणांतून विसर्ग घटविला

सध्या मुठा खोऱ्यातील खडकवासला धरणातून सर्वाधिक १ हजार ४९९ क्सुसेकने पाण्याचा विसर्ग डाव्या व उजव्या कालव्याला सुरू आहे. तर सांडव्याला सोडलेला विसर्ग बंद करण्यात आलेला आहे. टेमघर धरणातून २७० क्सुसेक विसर्ग विद्युतगृहासाठी सुरू आहे. नीरा खोऱ्यातील नीरा देवघर धरणांतून सर्वाधिक २ हजार २०० क्युसेकने डाव्या व उजव्या कालव्याला विसर्ग सुरू आहे.

कळमोडीतून १६४ क्युसेक, चासकमान ८५०, आंध्रा २८२, नाझरे १४४, गुंजवणी २५०, भाटघर १ हजार, आंध्रा ३३५, वडीवळे १००, गुंजवणी २००, भाटघर ३२४, नीरा देवघर ३५० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. कुकडी खोऱ्यातील पिंपळगाव जोगे धरणातून १५० क्युसेक, येडगाव १४०० डिंभे ९००, चिल्हेवाडी ४१०, घोडमधून १२३० क्सुसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच विसापूरमधून १०६, उजनीतून १५ हजार २६५ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे मुठा, पवना, आरळा, भीमा, इंद्रायणी, भामा, नीरा, मीना व घोड नदीतील पाण्याची पातळी बऱ्यापैकी कमी झाली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com