धरणातील पाण्याच्या विसर्गात घट

गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागांत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली.
Dam Water
Dam WaterAgrowon

पुणे : पावसाचा जोर (Rain Force) ओसरला असला तरी धरणांत पाण्याची आवक (Water Arrival In Dam) अजूनही सुरूच आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी खडकवासला (Khdakwasla Dam), कळमोडी, आंध्रा अशा काही धरणांतील पाण्याच्या विसर्गात घट करण्यात आली आहे. त्यामुळे नद्यांची पाणीपातळी कमी झाली आहे.

Dam Water
पावसाळ्यात जनावरांना पाणी देताना ही काळजी घ्या! | Rainy Season Water Management of Cow | ॲग्रोवन

गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागांत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली. आतापर्यंत तीन धरणे शंभर टक्के भरली असून, सात धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. या धरणांत ८० टक्क्यांहून अधिक पाण्याचा साठा झाला आहे. मात्र मागील चार ते पाच दिवसांपासून पावसाने चांगलीच उघडीप घेतली आहे. गुरुवारी (ता. २१) सकाळी आठ वाजेपर्यंत टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला, पवना, कासारसाई, कळमोडी, चास-कमान, भामा आसखेड, वडिवळे, गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर, पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, वडज या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या तुरळक सरी पडल्या होत्या. तर शेटफळ, नाझरे, वीर, चिल्हेवाडी, घोड, डिंभे, विसापूर आणि उजनी या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात ढगाळ वातावरणाची स्थिती कायम होती. आगामी काळात पाणी उपलब्ध होण्यासाठी धरणातील पाण्याचा विसर्ग सोमवारपासून (ता. १८) कमी करण्यात आला आहे.

Dam Water
नाशिक जिल्ह्यात धरणसाठा ४६ टक्क्यांवर

सध्या घोड धरणातून सर्वाधिक सात हजार ६४० क्सुसेकने पाण्याचा विसर्ग घोड नदीत सुरू आहे. तर वीर धरणातून उजव्या आणि डाव्या कालव्याला दोन हजार ४०३ क्युसेक, गुंजवणीतून विद्युतगृहासाठी २५० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. येडगाव धरणातून डाव्या कालव्याला व सांडव्याला २,११२ क्युसेकने पाण्याचा विसर्ग कुकडी नदीला सोडण्यात आला आहे.

वडज धरणातून डाव्या कालव्याला २१६ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. चिल्हेवाडीतूनही १,१३५ क्युसेकने सांडव्याला पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. खडकवासला धरणातूनही मुठा नदीत सोडलेला पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला असून, सध्या डाव्या व उजव्या कालव्याला १,५०९ क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. कासारसाई धरणातून सांडव्याला १३५ क्युसेकने पवना नदीला, कळमोडीतून सांडव्याला ६२८ क्युसेकने आरळ नदीला, तर चासकमान धरणातून डाव्या व सांडव्याला ३,६२० क्युसेकने भीमा नदीला, आंध्रातून सांडव्याला ५१६ क्युसेकने पाणी सोडल्याने इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत आहे.

धरणांच्या पाणलोट क्षेत्रनिहाय गुरुवारी (ता.२१) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)

टेमघर २५, वरसगाव ९, पानशेत ८, खडकवासला १, पवना ११, कासारसाई २, कळमोडी ८, चास-कमान २, भामा आसखेड ४, आंध्रा १, वडिवळे २१, गुंजवणी ७, भाटघर ३, नीरा देवघर १२, पिपळगाव जोगे ४, माणिकडोह ९, येडगाव ३, वडज ५

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com