धरणांच्या पाण्याच्या आवकेत घट

गेल्या पाच ते सहा दिवसापासून पावसाने उघडीप देण्यात सुरवात केली आहे. त्यातच घाटमाथ्यावरही पावसाचा जोर कमी झाला आहे. यामुळे धरणांच्या पाण्याच्या आवकेत घट झाली आहे.
Khadkwasala Dam
Khadkwasala DamAgrowon

पुणे : गेल्या पाच ते सहा दिवसापासून पावसाने (Pune Rain) उघडीप देण्यात सुरवात केली आहे. त्यातच घाटमाथ्यावरही पावसाचा जोर (Rain Intensity) कमी झाला आहे. यामुळे धरणांच्या पाण्याच्या आवकेत (Water Inflow In Dam) घट झाली आहे. रविवारी (ता.२१) सकाळी आठ वाजेपर्यच्या चोवीस तासांमध्ये ६.५० टीएमसी एवढी नव्याने पाण्याची आवक झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Khadkwasala Dam
Heavy Rain : अडीच लाखांवर शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका

चालू ऑगस्ट महिन्यात सुरवातीपासून चांगली दमदार हजेरी पावसाने लावली आहे. त्यामुळे ओढे, नाले भरून वाहत असल्याने धरणात नव्याने जवळपास १४ ते १५ टीएमसीपर्यत आवक वाढली होती. जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणे शंभर टक्के भरत आली आहेत. तर काही धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्याने नद्या दुथडी भरून वाहत आहे. मात्र, मागील काही दिवसापासून पावसाचा जोर कमी होण्यास सुरवात झाल्यानंतर हळूहळू पाण्याचा विसर्ग कमी करण्यात येत आहे.

Khadkwasala Dam
Heavy Rain : हिमाचल, उत्तराखंडमध्ये ढगफुटी

सध्या सर्वच धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. यामध्ये वीर धरणांतून सर्वाधिक १६ हजार ४१२ क्युसेकने विसर्ग अजूनही सुरू आहे. तर खडकवासला, टेमघर, वरसगाव, पानशेत, पवना, कासारसाई, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, आंध्रा, वडीवळे, गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर, येडगाव, डिंभे, वडज, घोड या धरणातूनही पाण्याचा कमीअधिक स्वरूपाचा पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

वडिवळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक २० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर मुळशी घाटमाथ्यावर ७४ मिलिमीटर पाऊस पडला असून लोणावळा घाटमाथ्यावर ४३, वळवण ३३, ठोकरवाडी ३०, शिरोटा २२ मिलिमीटर पाऊस पडला. टेमघर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात १५, कळमोडी १२, आंध्रा १०, नीरा देवघर १६ मिलिमीटर पाऊस पडला. तर वरसगाव, पानशेत, खडकवासला, पवना, कासारसाई, चासकमान, भामा आसखेड, आंध्रा, गुंजवणी, भाटघर, पिंपळगाव जोगे, माणिकडोह, डिंभे, चिल्हेवाडी या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. शेटफळ, नाझरे, वीर येडगाव, वडज, घोड, विसापूर, उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ढगाळ वातावरणाची स्थिती कायम होती. काही वेळा अधूनमधून ऊन पडत होते.

रविवारी (ता.२१) सकाळी आठ वाजेपर्यंत

खोरेनिहाय आलेले पाणी, टीएमसीमध्ये

खोरे -- पाणीसाठा

मुठा खोरे -- ०.३६

नीरा खोरे -- २.१०

कुकडी खोरे -- १.१२

मुळशी -- ०.४३

उजनी -- २.३५

भामा उपखोरे -- ६.५०

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com