Crop Insurance : विमाधारक शेतकऱ्यांना अग्रिम देण्यास नकार

पावसाने नुकसान झालेल्या विमाधारक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अग्रिम रक्कम देण्यास विमा कंपनीने नकारघंटा वाजविला आहे.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon

अमरावती : पावसाने नुकसान झालेल्या विमाधारक सोयाबीन उत्पादक (Insurance Holder Soybean Farmer) शेतकऱ्यांना अग्रिम रक्कम (Advance Insurance) देण्यास विमा कंपनीने नकारघंटा वाजविला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला तिलांजली देत कंपनीने पात्र शेतकऱ्यांना नकार देत असतानाच ४३ हजार ८०७ शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सर्वेक्षणही (Crop Damage Survey) केलेले नाही. सोयाबीनची कापणी (Soybean Harvesting) सुरू झाली आहे. सर्वेक्षण कधी होणार हा मुद्दा आहे.

Crop Insurance
Crop Insurance : सर्व्हर ठप्प; टोल फ्री सेवेची टोलवाटोलवी

पावसाने नुकसान झाल्याने जिल्ह्यातील एक लाख १९ हजार ११४ शेतकऱ्यांनी ७२ तासांत पूर्वसूचना दिल्या. यापैकी ७५ हजार ३०७ शेतकऱ्यांच्या नुकसानीचे संयुक्त सर्वेक्षण झाले आहे. १५ हजार ३३६ शेतकरी अपात्र ठरविण्यात आले आहेत. ४३ हजार ८०७ शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामेही झालेले नाहीत.

Crop Insurance
Crop Insurance : अकोल्यात पीकविमा कंपनीकडे ८५,७०३ पूर्वसूचना

अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या विमाधारक शेतकऱ्यांना हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत २५ टक्के अग्रिम रक्कम लागू करण्यासंदर्भात जिल्हास्तरीय समितीच्या मंजुरीनंतर १३ सप्टेंबरला जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भातील अधिसूचना जारी केली. त्यावर विमा कंपनीने आक्षेप घेत अधिसूचनेनुसार रक्कम देण्यास नकार दिला. कंपनीने घेतलेल्या आक्षेपांवर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून स्पष्टीकरण देत रक्कम देण्याचे आदेशही विमा कंपनीस देण्यात आले. मात्र त्यानंतरही विमा कंपनीची नकारघंटा कायम आहे.

कंपनीने नुकसानीच्या सर्वेक्षणासाठी प्रतिनिधीची नियुक्तीच केलेली नाही. तर काही ठिकाणी नियुक्त केलेले प्रतिनिधी सक्षम अर्हताधारक नव्हते. यावरून कंपनीला परतावाच द्यायचा नाही, असे स्पष्ट होत असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

पीक कापणी सुरू, पंचनामे प्रलंबितच

जिल्ह्यातील ४३ हजार ८०७ शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे अजूनही प्रलंबित आहेत. सोयाबीनची कापणी सुरू असल्याने आता पंचनामे केव्हा केले जाणार, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. कंपनीने मात्र पंचनाम्यांचा प्रयत्न करणार असल्याचे मोघम उत्तर देत वेळ मारून नेण्याचे धोरण अंगीकारले आहे. तर पात्र ठरविण्यात आलेल्या १५ हजार ५३६ शेतकऱ्यांच्या नुकसानीचे फेरपंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाने दिले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com