Subhash Bhamre : अतिवृष्टीमुळे पीकहानी संबंधी खासदार भामरेंनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

धुळे जिल्ह्याचा नुकसान भरपाई यादीत समावेशच नाही
Subhash Bhamre
Subhash BhamreAgrowon

धुळे : अतिवृष्टीमुळे (Wet Drought) नुकसान (Crop Damage) झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदत (Government Aid) जाहीर केली. मात्र, या यादीत धुळे जिल्ह्याचे नाव नसल्याच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. सुभाष भामरे (Subhash Bhamre) यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची भेट घेतली.

Subhash Bhamre
Wet Drought : पावसाचा जोर कमी; एका मंडलात अतिवृष्टी

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा अहवाल शासनाला पाठवावा, असे निर्देश खासदारांनी दिले. जिल्हा परिषदेचे कृषी सभापती संग्राम पाटील, माजी सदस्य प्रा. अरविंद जाधव, माजी सभापती रामकृष्ण खलाणे, गटनेते कामराज निकम, भाजपचे सरचिटणीस भाऊसाहेब देसले, तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील आदी या वेळी उपस्थित होते.

Subhash Bhamre
Wet Drought : ओला दुष्काळ जाहीर करून मदत द्यावी

पिकांचे नुकसान अधिक

खासदार डॉ. भामरे म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या पाच जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी ७५५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली. एनडीआरएफच्या अहवालाच्या बाहेर जाऊन त्यांनी नऊ जिल्ह्यांतील सर्व शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी हा निर्णय घेतला.

Subhash Bhamre
Eknath Shinde : ‘पंचायत राज’मार्फत शाश्वत विकासाची उद्दिष्टे गाठणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

मात्र, यादीत धुळे जिल्ह्याचे नाव नाही. अतिवृष्टीमुळे धुळे आणि साक्री तालुक्यांत कापसासह इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहू नये, अशी भूमिका आहे. ऑगस्टपर्यंतच पावसाची नोंद घेतलेली आहे. मात्र, जिल्ह्यात अनेक भागात सप्टेंबरमध्येही अतिवृष्टी झाली आहे.’’

जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

शासन निर्णयाप्रमाणे ६५ मिमि पावसाची नोंद असल्याशिवाय पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही. यात शासनाच्या ३१ जानेवारी १९८३ च्या निर्णयानुसार २४ तासांच्या कालावधीत अतिवृष्टी नसल्यास व पावसामुळे नुकसान झाले असल्यास जिल्हाधिकाऱ्यांनी खात्री करून नुकसानीचे स्वतंत्रपणे पंचनामे तयार करून शासनास मदतीबाबत अहवाल सादर करावा.

सोनगीर मंडळात कापडणे येथे ढगफुटी झाली. साक्री तालुक्यात बीटी कॉटनमध्ये सरासरी ७ ते ९ टक्के प्रोटीन टॉक्सीसचे प्रमाण कमी होऊन पिंक बोलवॉर्म याअळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. शिंदखेडा व शिरपूर तालुक्यात अधिक पावसाच्या ठिकाणी या अळीचा प्रादुर्भाव आहे.

त्यामुळे अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे नुकसानीचे स्वतंत्रपणे पंचनामे करून शासनास विशेष बाब म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी शासनास अहवाल पाठविण्याची सूचना आहे. तसेच याप्रश्‍नी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देऊ, असेही खासदार डॉ. भामरे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com