मराठवाड्यात आंबा संशोधन केंद्राचे विभागीय केंद्र व्हावे

मराठवाड्यात राष्ट्रीय आंबा संशोधन केंद्राचे विभागीय केंद्र व्हावे, अशी मागणी आंबा तज्ज्ञ भगवानराव कापसे यांनी केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांच्याकडे केली.
Mango
MangoAgrowon

औरंगाबाद : मराठवाड्यात राष्ट्रीय आंबा संशोधन केंद्राचे (National Mango Research Center) विभागीय केंद्र व्हावे, अशी मागणी आंबा तज्ज्ञ भगवानराव कापसे यांनी केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी (Kailas Chaudhari) यांच्याकडे केली. यावर विचार करण्याचे आश्वासन श्री. चौधरी यांनी दिले.

Mango
Mango : आंबा फळबागेचे संतुलित खत व्यवस्थापन

डॉ. कापसे यांनी जळगावचे खासदार उन्मेष पाटील व सहकाऱ्यांसह कृषी भवन नवी दिल्ली येथे श्री. चौधरी यांची भेट घेतली. या वेळी डॉ. कापसे यांनी ॲग्रो इंडिया गट शेती संघाच्या कार्याची माहिती देण्यासह आंबा अति घन लागवडीबाबत सादरीकरण केले.

Mango
Mango Cultivation: राज्यात वाढतेय आंबा लागवड

राजस्थानमध्ये डाळिंब लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र शेतकऱ्यांना योग्य प्रतीची कलमे मिळत नाहीत. त्यामुळे मर रोग तसेच तेल्या रोगामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यासाठी शेतकऱ्यांना चांगली कलमे मिळण्यासाठी ‘आयसीएआर’च्या विभागीय कृषी संशोधन केंद्रात खासगीकरणाच्या भागीदारीतून उत्कृष्ट कलमे तयार करता येतील का, या विषयी विचार करण्याचे चौधरी यांनी सुचविले.

जळगावचे खासदार उमेश पाटील यांनी संयुक्तिक रोप वाटिका सुशिक्षित बेकारांसाठी फायद्याची राहील, असे मत व्यक्त केले. जळगावचे युवक यात सहभागी होऊ शकतील, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, डॉ. कापसेलिखित ‘आंबा अति घन लागवड ते निर्यात’ हे पुस्तक चौधरी यांना भेट देण्यात आले. या वेळी विलास कापसे, सुगत नंदुरकर, ‘आयसीएआर’चे काही वरिष्ठ शास्त्रज्ञ उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com