Cooperative Organization : जिल्ह्यातील ५९२ सहकारी संस्थांची नोंदणी होणार रद्द

सहकार विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात या संस्था अवसायनात घेण्यात आल्या आहेत.
Cooperative Sector
Cooperative Sector Agrowon

Cooperative Sector सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ५९२ सहकारी संस्थांचे (Cooperative Organization) कागदोपत्रीही अस्तित्व संपण्याच्या मार्गावर आहे.

निवडणुका (Cooperative Election) घेण्यास संचालक मंडळाची उदासीनता, संस्थेचे लेखापरीक्षण न करणे या प्रमुख कारणास्तव या ५९२ सहकारी संस्था १४ फेब्रुवारीला अवसायनात घेण्यात आल्या आहेत. या संस्थांची नोंदणी रद्द करण्याची आता प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.

सहकार विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात या संस्था अवसायनात घेण्यात आल्या आहेत. यामध्ये जिल्ह्यातील ४३८ प्राथमिक दूध उत्पादक सहकारी संस्थांचा समावेश आहे. १४८ शेळी-मेंढी संस्थांचा समावेश आहे. पाच प्राथमिक मत्स्य संस्था व एका मध्यवर्ती मत्स्य संस्थेचा यामध्ये समावेश आहे.

Cooperative Sector
Cooperative Election : सोलापूर जिल्ह्यात सहकार निवडणुकांचा धुरळा

३१ मार्च २०२२ अखेर जिल्ह्यात १ हजार ३२९ एवढ्या सहकारी संस्था होत्या. १ एप्रिल २०२२ ते १४ फेब्रुवारी २०२३ पर्यंत जिल्ह्यातील ५९२ सहकारी संस्था अवसायनात घेण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात सध्या ७३८ एवढ्याच सहकारी संस्था कार्यरत आहेत.

कार्यरत असलेल्या संस्थांमध्ये ४ मध्यवर्ती सहकारी दूध संस्था, ५१० प्राथमिक सहकारी दूध संस्था, १ प्राथमिक इतर पशुधन उत्पादक संस्था, ८ प्राथमिक कुक्कुटपालन सहकारी संस्था, ११२ शेळी-मेंढी सहकारी संस्था, १०१ मच्छीमार संस्था व २ मध्यवर्ती कुक्कुटपालन संघाचा समावेश आहे.

Cooperative Sector
Cooperative Sector : बदलता सहकार आशादायकच

६९ संस्थांनी दिला प्रतिसाद...

सहकार विभागाने केलेल्या सर्व्हेक्षणात जिल्ह्यातील ६६० सहकारी संस्था बंद असल्याचे आढळले होते. या संस्थांना २८ डिसेंबर २०२२ रोजी नोटीस काढून संस्था बंद का करू नये? याची विचारणा करण्यात आली होती.

त्यापैकी ६९ संस्थांनी सकारात्मक प्रतिसाद देत संस्थेच्या निवडणुका घेण्यास आणि लेखापरीक्षण करण्यास सकारात्मकता दर्शविली आहे. त्यामुळे या संस्थांना वगळण्यात आले असल्याची माहिती सहायक निबंधक आबासाहेब गावडे यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com