Cashew Processing : रत्नागिरीतील काजू बी प्रक्रियाधारकांची नोंदणी

प्रक्रियेतील दर्जा राखणे आणि अन्य नियोजनासाठीची जबाबदारी ॠषिकेश परांजपे आणि विवेक बारगीर यांच्याकडे देण्यात आली आहे.
Cashew Loan
Cashew LoanAgrowon

रत्नागिरी ः यंदा भारतात मोठ्या प्रमाणात काजू बी (Cashew Seed) आयात (Cashew Import) झाली आहे. त्यातील प्रतिदिन ३० ते ४० टन काजू बी प्रक्रियेचे (Cashew Processing) कंत्राट रत्नागिरी जिल्ह्यातील प्रक्रिया धारकांना मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रक्रियाधारकांची नोंदणी जिल्हा काजू प्रक्रियाधारक संघ आणि परांजपे कॅश्यू यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली.

Cashew Loan
Cashew Processing: शून्यातून उभारलेला काजू प्रक्रिया उद्योग पोहोचला एक कोटीपर्यंत...

प्रक्रियेतील दर्जा राखणे आणि अन्य नियोजनासाठीची जबाबदारी ॠषिकेश परांजपे आणि विवेक बारगीर यांच्याकडे देण्यात आली आहे. मिरजोळे एमआयडीसीतील परांजपे अ‍ॅग्रो प्रोडक्टस्मध्ये सोमवारी (ता. २) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

Cashew Loan
Lumpy Vaccination : सिंधुदुर्गमध्ये ६४ टक्के जनावरांचे लसीकरण

या वेळी पणनचे मिलिंद जोशी, जिल्हा उद्योग केंद्राच्या विद्या कुलकर्णी, संतोष पेडणेकर, ॠषिकेश परांजपे, विवेक बारगीर, गव्हाणेचे जयवंत विचारे, संदेश दळवी यांच्यासह पन्नासहून अधिक काजू प्रक्रियाधारक उपस्थित होते. जॉबवर्क करण्यासाठी इच्छुक काजू प्रक्रियाधारकांकडून माहिती संकलित करण्यात आली.

Cashew Loan
Lumpy Vaccination : जिल्ह्यात ६१ टक्के जनावरांचे लसीकरण पूर्ण

याप्रसंगी श्री. बारगीर यांनी कर्ज पुनर्गठनासाठी माजी खासदार नीलेश राणेंच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयात बँकांची बैठक आयोजित केली जाणार असल्याचे सांगितले. तसेच पालकमंत्री उदय सामंतही काजू उद्योजकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

पणनचे अधिकारी मिलिंद जोशी यांनी काजू बीच्या बाजारपेठेतील सद्यःस्थितीबाबत मार्गदर्शन केले. ते म्हणाले, की मागील तीन महिन्यांत ९ लाख टन काजू बी विविध देशांतून आयात झाली आहे. मेंगलोर, न्हावाशेव्हा आणि तमिळनाडू येथील बंदरात हे काजू बी आले आहे.

त्यावर प्रक्रिया कशी होणार हा मोठा प्रश्‍न आहे. त्याचे काम विविध प्रक्रिया करून देणाऱ्यांना मिळू शकते. खर्च वजा जाता किलोमागे पाच रुपये कमवण्याची संधी मिळवता येणार आहे. याप्रसंगी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत कोणत्या योजना राबविल्या जातात यावर विद्या कुलकर्णी यांनी माहिती दिली. प्रशिक्षित कर्मचारी वर्ग असेल तर प्रक्रियाधारकांची क्षमता वाढेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com