Irrigation : सिंचनासाठी दोन दिवसांत पाणी सोडा ः मंत्री राठोड

‘‘रब्बी पिकाला पाण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
Water irrigation
Water irrigationAgrowon

यवतमाळ : ‘‘रब्बी (Rabi Crop) पिकाला पाण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व मोठ्या व मध्यम प्रकल्पांतून दोन दिवसांत पाणी सोडून शेतकऱ्यांना सिंचनासाठी (Agriculture Irrigation) पाणी उपलब्ध करून द्यावे,’’ अशा सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी दिल्या.

Water irrigation
Crop Damage Compensation : तुटपुंजी पीक नुकसानभरपाई परत केली विमा कंपनीला

जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात कालवे सल्लागार समितीची बैठक झाली. या वेळी आमदार मदन येरावार, प्रा. अशोक उईके, डॉ. संदीप धुर्वे, इंद्रनील नाईक, नामदेव ससाणे, संजीवरेड्डी बोदकुरवार, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीधर वाडेकर, सिंचन मंडळाचे अध्यक्ष म. ना. राजभोज, उपअधीक्षक अभियंता ग. ल. राठोड उपस्थित होते.

राठोड म्हणाले, ‘‘यावर्षी पाऊस जास्त झाला. सर्व प्रकल्पांत मुबलक पाणीसाठा आहे. मात्र, शेतकऱ्‍यांना पाणी वेळेत उपलब्ध झाले, तरच उपयुक्त ठरेल. त्यामुळे धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन तातडीने करावे. सिंचन करणारे शेतकरी आणि पाणीवापर संस्था सक्षम करण्यासाठी त्यांच्या कार्यशाळा, मेळावा घेऊन तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करावे. प्रकल्पनिहाय त्या-त्या कार्यक्षेत्रातील आमदारांची बैठक आयोजित करून त्या भागातील सिंचनासंबंधी असणारे प्रश्न निकाली काढावेत.’’

‘‘कालवा दुरुस्ती न झाल्यामुळे शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे नादुरुस्त कालवे दुरुस्त करण्यासाठी किती निधीची आवश्यकता आहे, याचा प्रस्ताव सादर करावा.

सोबतच पाणीपट्टी भरण्यासंदर्भातही शेतकऱ्‍यांमध्ये जनजागृती करा,’’ अशा सूचना त्यांनी दिल्या. ‘‘जिल्ह्यात मागील वर्षी ९७ हजार हेक्टर सिंचन झाले होते. यावर्षी एक लाख २७ हजार हेक्टर सिंचन करण्याचे नियोजन आहे,’’ असे जलसंपदाचे म. ना. राजभोज म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com