
अकोला ः जळगाव (जामोद), संग्रामपूर, शेगाव या तीन तालुक्यांमध्ये १७ ते १९ जुलैदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान (Crop Damage Due To Heavy Rain) झालेले आहे.या नुकसानाची हेक्टरी ५० हजार रुपये भरपाई (Compensation) मिळवून देतानाच ओला दुष्काळ (Wet Drought) जाहीर करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यामार्फत शासनाकडे करण्यात आली आहे. श्री. पवार यांची भेट घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रसेनजित पाटील (जळगाव जामोद, जि. बुलडाणा) यांनी निवेदन दिले.
श्री. पाटील यांनी म्हटले की, अतिवृष्टीमुळे तीन तालुक्यात प्रचंड नुकसान झाले. त्यातही प्रामुख्याने जळगाव (जामोद) तालुक्यातील वडशिंगी व जळगाव महसूल मंडळ, संग्रामपूर तालुक्यातील कवठळ, पातुर्डा व संग्रामपूर तथा शेगाव तालुक्यातील मनसगाव, जवळा, शेगाव महसूल मंडळांमध्ये कृषी विभागाच्या अहवालानुसार अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याचे निदर्शनास येते.
परंतु वास्तविक या तीनही तालुक्यांतील सर्व भागात पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. तरी आपण लक्ष देऊन राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई व ओला दुष्काळ जाहीर होण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही पाटील यांनी श्री. पवार यांना दिलेल्या निवेदनात मागणी केली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.