कुकडीच्या आवर्तनामुळे शेतकऱ्यांना दिलासा

कुकडी नदीपात्रातील पाणी कमी होऊन नदीचे पात्र पूर्णपणे कोरडे ठणठणीत झाले होते. परिणामी, कृषिपंप तसेच पिण्याच्या पाण्याचे पंप बंद पडले होते.
कुकडीच्या आवर्तनामुळे शेतकऱ्यांना दिलासा
Kukadi WaterAgrowon

आळेफाटा, जि. पुणे ः लांबलेल्या मॉन्सूनमुळे (Monsoon) पाणीटंचाई (Water Shortage) जाणवू लागल्यामुळे कुकडीच्या आवर्तनाची मागणी (Water Rotation) शेतकऱ्यांकडून होऊ लागली होती. जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील कुकडीच्या (Kukadi River) पात्रालगतची गावे आणि पिके तहानलेली होती. याची दखल घेत कुकडीचे आवर्तन सोडल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

कुकडी नदीपात्रातील पाणी कमी होऊन नदीचे पात्र पूर्णपणे कोरडे ठणठणीत झाले होते. परिणामी, कृषिपंप तसेच पिण्याच्या पाण्याचे पंप बंद पडले होते. कुकडी नदीकाठावर असणारी पिंपळवंडी, कांदळी, नगदवाडी, वडगाव कांदळी, आळे, साळवाडी बोरी, सुलतानपूर, शिरोली, निमगावसावा आदी गावे ही कुकडी नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. या गावांतील शेती ही कुकडी नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. परंतु काही दिवसांपासून कुकडी नदीचे पात्र कोरडे पडले होते. त्यामुळे शेतीला पाणी द्यायचे कसे असा प्रश्‍न शेतकरी वर्गाला पडला होता.

पाण्याअभावी शेतातील पिके जळू लागली होती. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍नही उभा राहिला होता. त्यामुळे नदी काठच्या गावांमधील शेतकऱ्यांनी तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्याकडे गेल्या आठवड्यात नदीला पाणी सोडावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार या मागणीकडे लक्ष देऊन त्या संदर्भाचे सूचना पाटबंधारे खात्याला देण्यात आल्या व बुधवारी (ता. १५) कुकडी नदीला पाणी सोडण्यात आले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com