शासनाला दिले न्यायालयाच्या निर्णयाचे स्मरण

दाखल याचिकेवर २९ एप्रिल २०२२ रोजी न्यायालयाने निर्णय दिला होता. त्यानुसार शासनाने आत्मा कर्मचाऱ्यांच्या समायोजना संदर्भात ३० ऑगस्ट २०२२ पर्यंत राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेणे अपेक्षित आहे.
Department Of Agriculture
Department Of AgricultureAgrowon

औरंगाबाद: न्यायालयाच्या निर्णयानुसार कृषी विभागाच्या (Agriculture Department) ‘आत्मा’च्या कर्मचाऱ्यांना (ATMA Employees) नियमित पदावर समायोजनासंदर्भात निर्णय घेण्यासाठी ५ दिवसांचा अवधी उरला आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान होऊ नये याचे स्मरण आत्मा एम्पलॉई वेल्फेअर असोसिएशनने (ATMA Employees Welfare Association) (महाराष्ट्र राज्य) शासन व प्रशासनाला करून दिले आहे.

Department Of Agriculture
Cotton : खारपाण पट्ट्यात पावसाने कपाशीची वाढ खुंटलेलीच

असोसिएशनच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेवर २९ एप्रिल २०२२ रोजी न्यायालयाने निर्णय दिला होता. त्यानुसार शासनाने आत्मा कर्मचाऱ्यांच्या समायोजना संदर्भात ३० ऑगस्ट २०२२ पर्यंत राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेणे अपेक्षित आहे. राज्यातील जवळपास ५३४ आत्मा कर्मचाऱ्यांच्या भविष्याविषयी निगडित हा प्रश्न आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार निर्णयाचा कालावधी संपण्याला काही दिवस शिल्लक असताना शासनाने व प्रशासनाने अजून तरी धोरणात्मक निर्णयासंदर्भात पावले उचलली गेली नाहीत किंवा तसे आत्मा एम्पलॉई वेल्फेअर असोसिएशनला कळविले गेलेले नाही.

३ जून २०२२ ला आत्मा एम्पलॉई वेल्फेअर असोसिएशनने प्रधान सचिव कृषी व पदुम यांना न्यायालयाचा निर्णय, आयुक्तांचे पत्र आदींचा संदर्भ देऊन सकारात्मक निर्णयाची मागणी केली होती. या मागणीपत्राच्या प्रति मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री, सचिव कृषी व सहकार, कृषी आयुक्त, संचालक आत्मा आदींनाही देण्यात आल्या होत्या. आता पावसाळी अधिवेशनदरम्यान कृषीमंत्र्यांसह, संचालक आत्मा पुणे, कृषी आयुक्तालय, कृषी सचिव इतर वरिष्ठांना शासनाकडून न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान होऊ नये याविषयी स्मरण करून देण्यात आले आहे.

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आमच्या कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याकरिता शासन व प्रशासनाला दिलेली मुदत संपण्याच्या उंबरठ्यावर आहे. शासनाकडून न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान होऊ नये व आम्हाला न्याय मिळावा ही अपेक्षा
किशोर गिरी, उपाध्यक्ष आत्मा एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन, औरंगाबाद

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com