
साखरखेर्डा, जि. बुलडाणा ः या परिसरात रब्बी हंगामामध्ये (Rabi Season) करडईचा पेरा (Safflower Sowing) वाढत असून, यंदाच्या हंगामात जवळपास ५२ हेक्टरवर लागवड (Safflower Cultivation) झाल्याचे समजते. पारंपरिक पिकांच्या जोडीला शेतकरी ही कालबाह्य झालेली पिके पुन्हा नव्याने घेऊ लागले आहेत.
आरोग्याच्या दृष्टीने करडई फायदेशीर मानली जाते. मात्र हे पीक वर्षानुवर्षे कालबाह्य झाले होते. आता पुन्हा त्याची लागवड केली जात आहे. कृषी पर्यवेक्षक गणेश बंगाळे व कृषी सहाय्यक संग्राम चेके यांनी याबाबत कृषी विभागाच्या वतीने जनजागृती केली.
कृषी विभागाच्या आवाहनाला प्रतिसाद देत मागील वर्षापेक्षा यावर्षी करडीच्या पेऱ्यात वाढ होताना दिसून आली. करडई विदर्भात रब्बी हंगामातील महत्त्वाचे कोरडवाहू पीक होते. १५ ते २० वर्षांपूर्वी पश्चिम विदर्भ, मराठवाड्यात या पिकाची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली जात होती. साधारणतः ७५ ते ८० दिवसांत पीक फुलोऱ्यावर येते.
सुमारे १२५ ते १३० दिवसांनी परिपक्व झाल्यावर त्या फुलाची बोंडे तयार होऊन त्यात तेलयुक्त पांढऱ्या करडी तयार होतात. करडईच्या १०० दाण्यांचे वजन ५ ते ७ ग्रॅम असते. यात ३० टक्के तेल, ६५ ते ७० टक्के ढेप मिळते. हेक्टरी अंदाजे १५ ते २० क्विंटल उत्पादन होते. करडीच्या झाडांना टोकदार काटे असल्याने सोंगणी करण्यासाठी प्रशिक्षित व अनुभवी मजूर लागतात. पूर्वी खामगाव, अकोला, जालना, साखरखेर्डा, मेहकर, लोणार या भागांत करडई तेल व ढेपेच्या व्यापारी पेठा होत्या.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.