शेतकरीविरोधी कायदे रद्द करा; अन्यथा आंदोलन

पुण्यात पदयात्रेदरम्यान शेतकरी संघटनांचा इशारा
शेतकरीविरोधी कायदे रद्द करा; अन्यथा आंदोलन
Anti Farmer LawAgrowon

पुणे ः शेतकरी विरोधी २५० पेक्षा अधिक कायदे हेच शेतकऱ्यांना आत्महत्यांना प्रोत्साहित करत आहेत. यामुळे हे कायदे कायमचे रद्द करावेत, अन्यथा देशपातळीवर मोठे आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा विविध शेतकरी संघटनांनी दिला.

अठरा जून हा शेतकरी पारतंत्र्य दिवस म्हणून पाळला जातो. या निमित्त विविध शेतकरी संघटनांनी येथील झाशीची राणी चौक ते फुलेवाडा अशी पदयात्रा शनिवारी (ता.१८) काढली. शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील, कार्याध्यक्ष कालिदास आपेट, किसानपुत्र आंदोलनाचे प्रवर्तक अमर हबीब, शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट, शेतकरी नेते अनंत देशपांडे, कार्यकर्ते विनय हर्डीकर, राहुल म्हस्के, क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे अध्यक्ष शिवाजी नांदखिले, कष्टकरी कामगार नेते नितीन पवार आदी या वेळी उपस्थित होते.

घनवट म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांना विविध कायद्यांच्या बेड्या ठोकल्या आहेत. तर हे सर्व कायदे व्यापार धार्जिणे असल्याने शेतकऱ्यांना कोणतेही स्वातंत्र्य नाही. आम्हाला संपूर्ण स्वातंत्र्य हवे आहे. यासाठी विविध शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याची गरज आहे. तरच शेतकरी आत्महत्या थांबल्या जातील.’’

हबीब म्हणाले,‘‘कायद्यातील ‘परिशिष्ट ९’ हे देशातील शेतकऱ्यांच्या जगण्याचा मूलभूत अधिकार नाकारणारे आहे. हे परिशिष्ट शेतकऱ्यांचे नागरिकत्व नाकारणारे आहे. यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागत आहेत.’’

सरकारचे धोरण हेच शेतकऱ्यांचे मरण झाले आहे. जागतिकीकरणामध्ये शेतकऱ्यांना तंत्रज्ञान आणि व्यापाराचे संपूर्ण स्वातंत्र्य हवे. विविध कायद्यांच्या आडून लूट होत असल्याने शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. हे कायदे तातडीने रद्द केले पाहिजेत.
रघुनाथदादा पाटील, प्रदेशाध्यक्ष, शेतकरी संघटना.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com