Anti Farmer Law : शेतकरी विरोधी कायदे रद्द करा

शेतकरी आत्महत्या या शेतकरी विरोधी कायद्यांमुळे होत आहेत. हे कायदे शासन रद्द करू शकते, पण शासन त्यावर काम करीत नाही.
Anti Farmer Law
Anti Farmer LawAgrowon

Dhule News : शेतकरी आत्महत्या (Farmer Suicide) या शेतकरी विरोधी कायद्यांमुळे (Anti Farmer Law) होत आहेत. हे कायदे शासन रद्द करू शकते, पण शासन त्यावर काम करीत नाही.

हे कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी झटणाऱ्या संस्था लढा देत राहतील, असा निर्धार किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब (Amar Habib) (बीड) यांनी येथे शेतकरी संवेदना यात्रेच्या समारोपप्रसंगी केला.

Anti Farmer Law
One Day hunger Strike : शेतकऱ्यांसाठी एकदिवसीय अन्नत्याग कशासाठी?

शेतकरी आत्महत्या व इतर शेती प्रश्नांबाबत किनगाव (ता. यावल, जि. जळगाव) येथे सुरू झालेल्या यात्रेचा रविवारी (ता. १९) धुळे येथे समारोप झाला. धुळे शहरातील जेल रोडवर सभा झाली.

Anti Farmer Law
Hunger Strike : किसानपुत्रांचे आज अन्नत्याग आंदोलन

या वेळी किसानपुत्र आंदोलनचे प्रणेते अमर हबीब, शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळे, अमरावती येथील राजाभाऊ कुर्जेकर अर्जुन बोराडे (नाशिक), जळगाव येथील ऋतुगंधा देशमुख, डॉ. प्रकाश पाटील (चोपडा, जि. जळगाव), शेतकरी संघटनेचे धुळे जिल्हा अध्यक्ष गुलाबसिंह रघुवंशी, आत्माराम बळीराम पाटील आदी उपस्थित होते.

ललित बहाळे म्हणाले, की शेतकरी पोशिंदा आहे. पण त्याची अडचण शासन, यंत्रणा यांना लक्षात येत नाही. यामुळे शेतकरी आत्महत्या थांबल्या नाहीत. त्याला जीवघेण्या कायद्यांत अडकवले आहे. हे कायदे, परिशिष्ट ९ रद्द करावे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com