Amar Habib
Amar HabibAgrowon

Amar Habib : गळाफास ठरणारे कायदे रद्द झाले तरच शेतकरी स्वतंत्र ः अमर हबीब

कमाल जमीन धारणा कायदा, जमीन अधिग्रहण कायदा, आवश्यक वस्तू कायदा हे तीन कायदे नरभक्षी, शेतकऱ्यांचा गळफास ठरणारे आहेत. हे कायदे रद्द झाले तरच शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळेल.

अॅग्रोवन वृत्तसेवा
परभणी ः कमाल जमीन धारणा कायदा, जमीन अधिग्रहण कायदा, आवश्यक वस्तू कायदा हे तीन कायदे नरभक्षी, शेतकऱ्यांचा गळफास ठरणारे आहेत. हे कायदे रद्द झाले तरच शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळेल.

शेतकरी स्वातंत्र्याची लढाई सर्जक विरुद्ध भक्षक अशी आहे. या देशातील शेतकरी आणि स्त्री हे दोन्ही घटक पारतंत्र्यात आहेत, असे प्रतिपादन किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब (Amar Habib) यांनी केले.

दैठणा (ता. परभणी) येथे मंगळवारी (ता. १४) रात्री आयोजित जाहीर सभेत बोलत होते. अॅड. मिलिंद यादव, अॅड. अरविंद सोळंके कुपटेकर, सुभाष कच्छवे यांची उपस्थिती होती.


हबीब म्हणाले, की भारतात आल्यानंतर महात्मा गांधींनी चंपारण्य येथे पहिले आंदोलन शेतकऱ्यांसाठी केले.

Amar Habib
शेतकरीविरोधी कायदे रद्द करा : अमर हबीब

स्वातंत्र्य लढ्यात शेतकऱ्यांना सोबत घेतले होते. परंतु शेतकऱ्यांच्या वाट्याला स्वातंत्र्य आले नाही. स्वातंत्र्याचा नव्हे तर गुलामीचा अमृत महोत्सव सुरू आहे.

बलसागर भारतासाठी आधी शेतकरी उभा करावा लागेल. पहिल्या घटना दुरुस्तीचा परिणाम शेतकरी आत्महत्या आहेत.

शेतकरी आत्महत्याप्रती सहवेदना व्यक्त करण्यासाठी १९ मार्च रोजी एक दिवस उपवास करावा, असे आवाहन हबीब यांनी केले. प्रास्ताविक कच्छवे यांनी केले. शेतकरी उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com