Recharge Project : पुनर्भरण प्रकल्पाचा अहवाल अंतिम टप्प्यात

खारपाणपट्ट्याचा अभिशाप कायमचा पुसणारः आमदार कुटे
Water
WaterAgrowon

संग्रामपूर, जि. बुलडाणा ः महाराष्ट्र व मध्य प्रदेशाच्या सीमावर्ती भागातील पूर्णा (Purna) व तापी (Tapi) नदीवर आशिया खंडातील सर्वात मोठ्या फॉल्ट झोनमध्ये पावसाचे पाणी जमिनीच्या आत सोडून खाली असलेले अशुद्ध पाणी शुद्ध करण्याचा महाकाय पुनर्भरण प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात आहे.

याचा सविस्तर आढावा माजीमंत्री तथा आमदार डॉ. संजय कुटे यांनी तापी पाटबंधारे प्रकल्प महामंडळाचे सल्लागार व्ही. डी. पाटील तसेच विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडून घेतला. यावेळी त्यांनी जळगाव जामोद मतदारसंघातील रायपूर या आदिवासी गावाजवळ निर्माण होणाऱ्या टनेलच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी केली व प्रकल्पाच्या तांत्रिक बाबी समजून घेतल्या.

Water
एच.टी. कापूस बियाणे समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात

या प्रकल्पांतर्गत एकूण ३२ टीएमसी इतका पाणी वापर होणार असून, दरवर्षी पावसाळ्याचे दिवस पकडून एकूण १२० दिवस जमिनीच्या आत व नदीनाल्यांना पाणी सोडण्यात येणार आहे. यामुळे जमिनीच्या आत पाणी मुरून पाण्याची शुद्धता व पाण्याची पातळी वाढणार असून पूर्ण ३६५ दिवस विहिरीला पाणी उपलब्ध झाल्याने शेतकरी बांधवांना बारमाही पीक घेता येईल. त्यामुळे सिंचनाचा शेतकऱ्याना मोठा लाभ होणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या सीमा हद्दीत जळगाव जामोद ते अचलपूर अशी १२४ किलोमीटर आणि मध्य प्रदेश राज्य सीमा हद्दीत इच्छापूर ते धारणीपर्यंत १३६ किलोमीटर लाइन जमिनीच्या आत निर्माण केली जाणार आहे. ज्यावाटे पाणी जमिनीच्या आतमध्ये सोडले जाईल. या प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे काम २०१७ मध्ये सुरू झाले होते. हवाईमार्गे हे काम झाले.

वाण धरण केवळ एक टीएमसी पाणी असलेला प्रकल्प मतदारसंघातील गावांची पिण्याच्या पाण्याची तहान पूर्ण करीत आहे. तर, ३२ टीएमसी पाणी वापर असलेल्या या महाकाय पुनर्भरण प्रकल्पामुळे लाखो हेक्टर जमिनीची तहान भागणार आहे. जळगाव जामोद मतदारसंघातील कुऱ्हा, वडोदा, इस्लामपूर उपसा सिंचन प्रकल्प, अरकचेरी व आलेवाडी लघुसिंचन प्रकल्पात ओपन कट (मोठा नाला) निर्माण करून साचलेले पाणी सोडता येणार असल्याने मतदारसंघातील हे प्रकल्प नेहमीच भरलेले राहतील व याचा देखील शेतकऱ्याना शेती सिंचनासाठी मोठा फायदा होणार आहे. येत्या मार्चमध्ये केंद्र सरकारकडे मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

- डॉ. संजय कुटे, आमदार, जळगाव जामोद

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com