Pomegranate : राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, बेयर क्रॉपसायन्सेसमध्ये संशोधन करार

या संशोधन सहकार्याचे मुख्य उद्दिष्ट निर्यात दर्जाच्या डाळिंब उत्पादनासाठी एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन वेळापत्रक (आयडीआयपीएम) विकसित करणे आणि राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर येथे मॉडेल डाळिंब बाग विकसित करणे हा आहे.
Pomegranate
PomegranateAgrowon

Solapur News : येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र आणि बेयर क्रॉपसायन्सेस लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या संशोधन सहकार्याचे मुख्य उद्दिष्ट निर्यात दर्जाच्या डाळिंब उत्पादनासाठी एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन वेळापत्रक (आयडीआयपीएम) विकसित करणे आणि राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर येथे मॉडेल डाळिंब बाग विकसित करणे हा आहे.

डाळिंब संशोधन केंद्राचे केंद्र संचालक डॉ. राजीव मराठे आणि बेयर क्रॉपसायन्सेसचे पीक विभाग प्रमुख योगेश मोहिते यांनी आपापल्या संस्थांच्या वतीने सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

Pomegranate
Pomegranate Orchard Planning : सांगोल्यातील सदाशिव चौगुले यांनी १४ एकर डाळींब बागेचं केलंय योग्य नियोजन

या सामंजस्य करारानुसार, बायरच्या मदतीने, डाळिंब संशोधन केंद्र तंत्रज्ञान प्रात्यक्षिकांसाठी सोलापूर येथे मॉडेल बाग विकसित करेल आणि निर्यात दर्जाच्या डाळिंब उत्पादनासाठी युरोपियन युनियन (ईयू) ने बनवलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार डाळिंब पीक संरक्षणासाठी लागणाऱ्या औषधांची कमाल अवशेष पातळी (एमआरएल) आणि फवारणी नंतर व फळ तोडणी पूर्वी लागणारा वेळ (प्री-हार्वेस्ट इंटरव्हल, पीएचआय) सोबत एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन वेळापत्रक तयार करून त्याचे मूल्यमापन करेल, हे एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन वेळापत्रक राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रामध्ये दोन हंगामासाठी आणि शेतकऱ्यांच्या शेतात तिसऱ्या वर्षांपासून मूल्यांकन केले जाईल.

Pomegranate
Pomegranate Production : डाळिंबाच्या क्षेत्र वाढीसाठी प्रयत्न करणार

या वेळी बोलताना डॉ. मराठे यांनी केंद्राने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी विकसित केलेल्या उत्पादन, संरक्षण आणि प्रक्रिया तंत्रज्ञानावर प्रकाश टाकला. तसेच त्यांनी डाळिंबासारख्या नगदी पिकासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी मजबूत करण्यासाठी आणि युरोपियन बाजारपेठेत निर्यात करण्यास इच्छुक असलेल्या डाळिंब शेतकऱ्यांसाठी सामंजस्य कराराचे महत्त्व अधोरेखित केले.

या प्रकल्पासाठी डाळिंब संशोधन केंद्रातील वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. ज्योत्सना शर्मा, डॉ. चंद्रकांत अवचारे, डॉ. मंजुनाथा, डॉ. सोमनाथ पोखरे आणि डॉ. मल्लिकार्जुन काम करतील.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com