Ban Alcohol : तुंगतमध्ये महिलांच्या विशेष ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव

गावातील व्यसनाधीनतेवर महिलांनी आवाज उठविला आहे. आता महिलांच्या विशेष ग्रामसभेत ‘दारूबंदीचा’ ठराव एकमताने संमत करण्यात आला आहे.
Prohibition of Alcohol
Prohibition of AlcoholAgrowon

सोलापूर ः गावाच्या विकासात महिलांचा सहभाग वाढावा, यासाठी तुंगत (ता. पंढरपूर) ग्रामपंचायतीकडून (Grampanchyat) प्रयत्न केले जात आहेत. समस्या मांडण्यासाठी महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले.

तसेच गावातील व्यसनाधीनतेवर महिलांनी आवाज उठविला आहे. आता महिलांच्या विशेष ग्रामसभेत ‘दारूबंदीचा’ (Ban Alcohol) ठराव एकमताने संमत करण्यात आला आहे.

आळंदी ते मोहोळ पालखी मार्ग तुंगत येथून जातो. रस्त्याचे काम सुरू असून, तुंगत येथे भुयारी रस्ता तयार करण्यात आलेला आहे. सध्या ग्रामस्थांना व वाहनांना जाण्यासाठी पुलाची जागा संबंधित विभागाकडून नियोजित करण्यात आलेली आहे.

नियोजित पुलाची जागा महिला, वृद्ध आणि प्रामुख्याने शालेय विद्यार्थ्यांसाठी गैरसोयीची होत आहे. पालखी मार्गामुळे बाहेरील व्यक्तींची गती वाढेल. परंतु सध्याच्या पुलामुळे तुंगत ग्रामस्थांची व वाहनांची गती मात्र कमी होईल. त्यामुळे ग्रामस्थांच्या सोयीचा होईल, अशा ठिकाणी पुलाची निर्मिती करण्याची गरजेची आहे.

या संदर्भातही महिलांच्या ग्रामसभेत एकमताने ठराव करण्यात आला आहे. तुंगत येथे दारूविक्रीसाठी कोणताही शासनाचा अधिकृत परवाना देण्यात आलेला नाही.

दारूविक्री करू नये, यासाठी सुरुवातीपासूनच ग्रामपंचायतीने कुणासही परवान्यासाठी परवानगी दिलेली नव्हती. परंतु सध्या अवैधरीत्या व खुलेआमपणे दारूविक्री सुरू आहे.

Prohibition of Alcohol
Farmer Incentive Scheme : नियमित कर्जदारांचे १०० कोटी अडकले

व्यसनाधीनतेमुळे कुटुंबात वाद होण्याचे प्रमाण वाढत आहे. निवडणूक, जत्रा, सार्वजनिक कार्यक्रमातही भांडणे होण्याचे प्रसंग घडले आहेत. त्याचाच भाग म्हणून गावात दारूबंदीसाठी या वेळी ठराव करण्यात आला.

महिलांनी एकमुखाने दारूबंदीसाठी ग्रामसभेत मागणी केली आहे. या संदर्भात ठरावही मंजूर करण्यात आला आहे. व्यसनाधीनता कमी करून गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचा आम्ही आता पाठपुरावा करणार आहोत.
डॉ. अमृता रणदिवे, सरपंच, तुंगत ग्रामपंचायत, ता. पंढरपूर

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com