काँग्रेसमुक्त जिल्हा करण्याचा निर्धार

डॉ. राजेंद्र गवई यांचा काँग्रेसला निर्वाणीचा इशारा
काँग्रेस 'यूपी'त स्वबळावर ऐंशी जागा लढणार
काँग्रेस 'यूपी'त स्वबळावर ऐंशी जागा लढणारResolve to make a Congress-free district

ॲग्रोवन वृत्तसेवा

अमरावती : काँग्रेसने (Congress) नेहमीच लहान पक्ष संपविले आहेत, मात्र आरपीआय (RPI)(रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई)) त्याला बळी पडणार नाही. आरपीआयला खालची जागा दाखविण्याच्या प्रयत्नात असलेल्या काँग्रेसला त्यांची जागा दाखविण्याची ही योग्य वेळ आली आहे. त्यासाठी प्रसंगी भारतीय जनता पक्षाशी घरोबा करून जिल्ह्यातून काँग्रेसचे नामोनिशान मिटविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. असा निर्वाणीचा इशारा डॉ. राजेंद्र गवई यांनी काँग्रेसला दिला.

काँग्रेस 'यूपी'त स्वबळावर ऐंशी जागा लढणार
Cotton Seed Technology : दोन वर्षांत नवे कापूस बियाणे तंत्रज्ञान येणार

डॉ. गवई म्हणाले, ‘‘राज्यातील भाजप नेते तसेच मुख्यमंत्र्यांशी नुकतीच भेट झाली असून, या भेटीत दोन्ही पक्षांतील नेत्यांनी आपल्याला सोबत येण्याची ऑफर दिली आहे, मात्र आपण बॅकडोअर एन्ट्री न घेता निवडणूक लढवूनच सोबत येणार असे आपण त्यांना सांगितले. अमरावती लोकसभेची जागा आपण लढणार असून, त्यासाठी भाजप किंवा काँग्रेसचे चिन्ह घेणार नाही,’’ असे त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस 'यूपी'त स्वबळावर ऐंशी जागा लढणार
Soybean Rate : वायदेबंदीमुळं सोयाबीन उत्पादकांना फटका?

काँग्रेसच्या स्थानिक नेतेमंडळींकडून खच्चीकरण केले जात आहे. आरपीआय ऐक्यासाठी प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे यांच्याशी चर्चा करण्यासाठी सदैव तयार आहोत. मात्र आधी त्यांची तयारी असली पाहिजे. प्रकाश आंबेडकर तयार असतील तर आपला पक्ष त्यांना देऊ, असे विधानसुद्धा त्यांनी केले.

तिवस्यातून लढणार आगामी निवडणूक

येत्या काळात काँग्रेसने आपली भूमिका बदलली नाही तर भाजपसोबतच आम्ही जाणारच आहोत. अमरावती लोकसभा तसेच आठ विधानसभा मतदार संघात आम्ही स्वबळावर किंवा भाजपसोबत युती करून काँग्रेसचा धुव्वा उडविणार, असा इशाराही त्यांनी दिला. आगामी विधानसभा निवडणूक आपण तिवसा मतदार संघातून लढणार असल्याचेही त्यांनी या वेळी जाहीर केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com