महाराजस्व अभियानांतर्गत अवसरीत ४६६ प्रकरणे निकाली

आंबेगाव तालुक्यातील नागरिक, शेतकरी व शेतमजूर यांचे प्रश्‍न त्वरित निकाली राबविण्यात येत असलेले महाराजस्व अभियान आता तालुक्यातील सर्व मंडल स्तरावर जून महिन्यातील दर बुधवारी विस्तारित स्वरूपात करण्यात येतात.
Land Record
Land RecordAgrowon

अवसरी, ता. आंबेगाव : तालुक्यातील अवसरी बुद्रुक येथे नुकतेच महाराजस्व अभियान (Maharajasw Abhiyan) राबविण्यात आले. याअंतर्गत पारगाव मंडल स्तरावरील ५३० प्रकरणांपैकी ४६६ प्रकरणे निकाली केल्याची माहिती तहसीलदार रामा जोशी यांनी दिली.

आंबेगाव तालुक्यातील नागरिक, शेतकरी व शेतमजूर यांचे प्रश्‍न त्वरित निकाली राबविण्यात येत असलेले महाराजस्व अभियान आता तालुक्यातील सर्व मंडल स्तरावर जून महिन्यातील दर बुधवारी विस्तारित स्वरूपात करण्यात येतात. तालुक्यात यापूर्वी डिंभे, घोडेगाव, कळंब या ठिकाणी नागरिकांचा महाराजस्व पारगाव मंडल स्तरावर अवसरी बुद्रुक येथे आयोजित अभियानाला नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला.

Land Record
हरभरा, धानानंतर आता ज्वारीच्या सरकारी खरेदीचा गुंता

अवसरी बुद्रुक येथे पारगाव मंडलस्तरावर महाराजस्व अभियान अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. या वेळी अवसरी सरपंच पवन हिले, उपसरपंच सचिन हिंगे, टाव्हरेवाडी सरपंच उत्तम टाव्हरे, प्रशांत वाडेकर, अजित चव्हाण, स्वप्नील हिंगे, नायब तहसीलदार लतादेवी वाजे, सचिन वाघ, दामूराजे असवले, राम बारवे, मंडलाधिकारी विश्‍वास शिंदे तलाठी संकेत गवारे, पोलिस पाटील माधुरी जाधव, अशोक दळवी, संतोष शिंगाडे, तसेच महसूल विभागाचे कर्मचारी आदी उपस्थित होते. आंबेगाव तालुक्यातील पारगाव मंडल विभागात शेतीचे व शेतीच्या रस्त्याच्या वादाची सर्वांत जास्त प्रकरणे आहेत.

महाराजस्व अभियान अंतर्गत मतदार नोंदणी १४. जातीचे दाखले ४, उत्पन्नाचे दाखले ४९. संजय गांधी योजना ४, नवीन रेशन कार्ड ४, रेशन कार्डमध्ये नाव वाढ २८, दुबार रेशन कार्ड १२, रेशन कार्डमधील नाव कमी १८ ई-पीक पाहणी ६५, हक्क नोंदणी कलम १५५ अंतर्गत १७, वारस नोंद १०, सात-बारा वाटप १९१, फेरफार नोंद ५१, पुनर्वसन अडथळा दूर करणे २ आदी ५३० प्रकरणांचे स्थानकात करण्यात आली असून, यातील ४६६ प्रकरणी जागेवरच निकाली काढण्यात आली आहेत. ६३ प्रकरणे शिल्लक राहिली आहेत, अशी माहिती मंडलाधिकारी विश्‍वास शिंदे यांनी दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com