व्यापाऱ्यांच्या देशव्यापी बंदला प्रतिसाद

जम्मूसह देशभरातील अनेक राज्यांत व्यापाऱ्यांनी (Traders) दुकाने बंद ठेवून बंदला प्रतिसाद दिला. महाराष्ट्रातही बंदला व्यापाऱ्यांचा प्रतिसाद मिळाला.
Traders Organisations
Traders OrganisationsAgrowon

नवी दिल्ली ः नॉन ब्रँडेड खाद्यान्न तसेच डाळींवर पाच टक्के जीएसटी (GST) लावण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून त्याची अंमलबजावणी सोमवारपासून (ता. १८) होणार आहे. या निर्णयाचा सर्वच स्तरांतून निषेध आणि विरोध आहे. पाच टक्‍के जीएसटी आकारण्याचा निर्णय छोट्या व्यापाऱ्यांसाठी मारक असून तो तत्काळ मागे घ्यावा या मागणीसाठी आज देशभरातील व्यापारी संघटना तसेच बाजार समितांनी शनिवारी (ता. १६) देशव्यापी बंदची हाक दिली होती. या बंदला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला.

जम्मूसह देशभरातील अनेक राज्यांत व्यापाऱ्यांनी (Traders) दुकाने बंद ठेवून बंदला प्रतिसाद दिला. महाराष्ट्रातही बंदला व्यापाऱ्यांचा प्रतिसाद मिळाला. केंद्र सरकारने नॉन ब्रँडेड खाद्यान्न तसेच डाळींवर पाच टक्के जीएसटी (GST) लावण्याचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी करत जम्मूमध्ये व्यापाऱ्यांनी निर्णयाविरोधात जोरदार निदर्शने केली.

मुंबई, पुण्यासह राज्यातही बंद

नवी मुंबई एपीएमसीच्या घाऊक धान्य आणि मसाले बाजारातील व्यापाऱ्यांनी अलीकडेच जीएसटी दरांचे तर्कसंगतीकरण आणि त्यापूर्वी वगळलेल्या अनब्रँडेड पॅकेज खाद्यपदार्थांवर जीएसटी लादण्यासह समस्यांच्या निषेधार्थ शनिवारी (ता. १६) एकदिवसीय संप पुकारला. राज्यातील एपीएमसीसह अनेक किरकोळ दुकाने बंद होती.

व्यापारी संघटना संबंधित राज्यांच्या अर्थमंत्र्यांना भेटून हा प्रश्न त्यांच्याकडे मांडणार आहेत. सांगलीही पाच टक्के जीएसटी (GST) आकारण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी बाजार समित्यांनी बंद पुकारला होता. यामुळे बाजार समितीतील १० कोटींची उलाढाल ठप्प झाली होती. इंदापुरातील व्यापाऱ्यांनीही बंद पुकारून केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवला.

शनिवारी इंदापूर (Indapur) शहर किराणा व आडते व्यापारी संघटनेने दुकाने कडकडीत बंद ठेवून शहरातून निषेध मोर्चा काढला. इंदापूर शहरातील व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पुण्यातही बाजार समित्यांनी बंद पाळून निषेध केला. अकोल्यातही जीएसटीच्या नव्या कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी येथील फूड इंडस्ट्री (Food Industry) व सर्व बाजार समित्यांमध्ये व्यापाऱ्यांनी बंद पाळला. या बंदमुळे कोट्यवधींचे व्यवहार ठप्प पडले होते.

देशभरातील गिरण्यांचाही बंद

देशात महागाईविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात आणखी एक दुवा जोडला गेला आहे. देशभरातील ७३०० कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी १८ जुलैपासून अनब्रँडेड प्री-पॅकेज्ड आणि प्री-लेबल केलेले पीठ, डाळी, दही, गूळ यासह विविध खाद्यपदार्थांवर ५ टक्के जीएसटी (GST) लादल्याच्या निषेधार्थ १३,००० डाळी गिरण्या, ९,६०० तांदूळ गिरण्या, ८,००० पीठ गिरण्या आणि ३० लाख लहान गिरण्या बंद करण्याचे जाहीर केले. भारतीय उद्योग मंडळाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत सुमारे तीन कोटी किरकोळ व्यापारीही व्यवसाय बंदमध्ये सहभागी होतील, असा निर्णय घेण्यात आला आहे.

हा प्रस्ताव सरकारपुढे ठेवला आहे

२८ आणि २९ जुलै रोजी चंदीगड येथे आयोजित करण्यात आली असून जीएसटी कौन्सिलच्या या बैठकीत कौन्सिलचे सदस्य केंद्र सरकारला शिफारस करणार आहेत की जे अन्नपदार्थ आणि धान्य इत्यादी ब्रँडेड श्रेणीत येत नाहीत त्यांना ही सूट द्यावी. कायदेशीर मेट्रोलॉजी कायद्यांतर्गत परिभाषित केल्यानुसार प्री-पॅकेज केलेले आणि प्री-लेबल केलेले रिटेल पॅक सूटमधून वगळलेले आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com